Dhananjay Munde: "मला ठरवून टार्गेट केले जात आहे, पण मी..."; धनंजय मुंडेंनी विरोधकांना दिला इशारा
Dhananjay Munde Shirdi Speech : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडला आणि इतर आरोपींना काल शनिवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मंत्री धनंजय मुंडेंनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात दिली मोठी प्रतिक्रिया

"माझा अभिमन्यु करण्याचा प्रयत्न केला तरीही..."

धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde Shirdi Speech : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडला आणि इतर आरोपींना काल शनिवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. याच पार्श्वभूमीवर विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केलीय. अशातच खुद्द मंत्री धनंजय मुंडे यांनी शिर्डी येथील राष्ट्रवादीच्या शिबिरात मोठं विधान करून या चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मला ठरवून टार्गेट केले जात आहे, पण मी अभिमन्यु नाही, मी अर्जुन आहे, असं म्हणत मुंडेंनी विरोधकांचा समाचार घेतला.
धनंजय मुंडे भाषणात काय म्हणाले?
धनंजय मुंडे म्हणाले, स्व.संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवा. बीड म्हणजे बिहार आणि परळी म्हणजे तालिबान, अशी भयानक खोटी प्रतिमा तयार केली जात आहे. आम्ही ऊसतोड कामगार, वैद्यनाथांच्या परळीला आणि बीड जिल्ह्याला बदनाम करु नका. कार्यकर्त्याला ताकत देताना विश्वास महत्त्वाचा आहे. तरच संघटन मजबूत होईल.
हे ही वाचा >> Saif Ali Khan वर चाकूने हल्ला करणारा बांगलादेशी? पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती
मुंडे पुढे म्हणाले, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून अजितदादांच्या प्रत्येक निर्णयात ठामपणे सोबत उभा राहिलो. पक्षाच्या वाईट काळात वेगवेगळी आंदोलने, यात्रा आदींच्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. मात्र, आता बीड जिल्ह्यातील एका दुर्दैवी हत्या प्रकरणा आडून मला जाणीवपूर्वक ठरवून टार्गेट केले जात आहे. महायुतीतील नेत्यांकडूनच मला लक्ष्य केले जात आहे, याचेच जास्त वाईट वाटत आहे. पक्षातील काही लोक देखील दादांच्या कानाला लागून चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत आहेत. मात्र तरीही माझी भूमिका व वस्तुस्थितीची जाणीव असल्याने या कठीण काळातही पक्ष म्हणून दादा माझ्या पाठीशी उभे आहेत.
हे ही वाचा >> Saif Ali Khan Case: चोर बिल्डिंगमध्ये कसा घुसला? कुठे लपला? सैफवर हल्ला का केला? 'त्या' रात्रीचं सर्व सत्य आलं समोर
आज कुणी निराधार व बिनबुडाचे कितीही आरोप करून मला अडकवण्याचा, माझा अभिमन्यु करण्याचा प्रयत्न केला तरीही उपयोग होणार नाही, कारण मी अभिमन्यु नाही, मी अर्जुन आहे! अजित दादांनी आता बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले आहे, याचा आनंदच असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे, असंही धनंजय मुंडे म्हणाले.
पक्षात आल्यापासून आजवरच्या वाटचालीत आमचे नेते म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहिलो. अनेक प्रसंगी अजितदादांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न झाला. तुमच्या अंगावर कोणी आले तर त्याला आम्ही शिंगावर घेतले. २०१४ - १९ या काळात विरोधी पक्षनेतेपदी काम केले. पक्षाच्या पडत्या काळात चार वेळा हल्लाबोल, परिवर्तन, शिवस्वराज्य यात्रांमध्ये सहभागी होऊन सबंध महाराष्ट्र पिंजून काढला. तत्कालीन सरकारला वाकवायचे काम केले, असंही ते म्हणाले.