रोहित शर्माला वनडेच्या कर्णधारपदावरुन हटवलं, ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; भारताचं नेतृत्व कोण करणार?

Team India Squad : रोहित शर्माला वनडेच्या कर्णधारपदावरुन हटवलं, ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; भारताचं नेतृत्व कोण करणार?

Mumbai Tak

मुंबई तक

04 Oct 2025 (अपडेटेड: 04 Oct 2025, 07:36 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

रोहित शर्माला वनडेच्या कर्णधारपदावरुन हटवलं

point

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा

Team India Squad : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यापूर्वी बीसीसीआयची शनिवारी (दि.4) एक दीर्घ बैठक पार पडली. या बैठकीनंतर बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी 26 वर्षीय युवा फलंदाज शुभमन गिल याची कर्णधार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. निवड समितीने रोहित शर्माला कर्णधारपदावरुन हटवून ही जबाबदारी शुभमन गिलच्या खांद्यावर सोपवली आहे. त्यामुळे आता टेस्ट आणि वनडे दोन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व शुभमन गिलकडे असेल. या बैठकीनंतरच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली.

हे वाचलं का?

बीसीसीआयने टीम सिलेक्शन मीटिंगनंतर हा निर्णय घेतला. टेस्टनंतर वनडे संघाचीही कर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्माकडून काढून घेण्यात आली आहे. मात्र, रोहित शर्मा आणि वरिष्ठ फलंदाज विराट कोहली हे दोघेही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वनडे मालिकेत टीम इंडियाचा भाग असतील. दोघांचाही 15 खेळाडूंच्या संघात समावेश करण्यात आला आहे.

 शुभमन गिल  वनडे कर्णधार म्हणून 19 ऑक्टोबर रोजी पहिला सामना खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे सामना 19 ऑक्टोबर रोजी पर्थच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे . त्यानंतर दुसरा सामना 23 ऑक्टोबर रोजी अ‍ॅडिलेडमध्ये आणि तिसरा व शेवटचा सामना 25 ऑक्टोबर रोजी सिडनी येथे खेळवला जाईल.

हेही वाचा : गौतमी पाटीलला उचलायचं की नाही? चंद्रकांत पाटलांचा पोलिसांना फोन; रोहित पवार म्हणाले, पुण्यातील गुंड परदेशात...

श्रेयस अय्यरवर उपकर्णधारपदाची जबाबदारी 

मिडल ऑर्डरमधील स्टार फलंदाज श्रेयस अय्यरला बीसीसीआयने वनडे संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त केलं आहे. याआधी अनेक रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की, रोहितच्या जागी श्रेयस अय्यरला वनडे कर्णधार बनवण्यात येईल. मात्र शेवटी शुभमन गिलच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय. या निर्णयावरून बीसीसीआयचा हेतू स्पष्ट दिसतो की, भविष्यात प्रत्येक फॉरमॅटसाठी एकच कर्णधार ठेवण्याचा त्यांचा विचार आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहलीलाही वनडे संघात स्थान

रोहितकडून कर्णधारपद काढून घेतलं असलं तरी त्याचा वनडे संघात समावेश करण्यात आला आहे. तसेच अनुभवी फलंदाज विराट कोहलीलाही संघात स्थान मिळालं आहे. हार्दिक पांड्या मात्र या संघात नाही. अष्टपैलू खेळाडू म्हणून नितीश कुमार रेड्डीचा समावेश करण्यात आला आहे, तर यशस्वी जायसवाल तिसऱ्या ओपनरच्या भूमिकेत असतील.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे मालिकेसाठी भारताचा संघ –

शुभमन गिल (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल (यष्टिरक्षक), अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, वाशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक) आणि यशस्वी जयस्वाल

इतर महत्त्वाच्या बातम्या

रामदास कदमांच्या बायकोने 1993 मध्ये स्वत:ला जाळून घेतलं की कोणी तिला जाळलं? अनिल परब यांचे सनसनाटी आरोप

    follow whatsapp