Video: ना नो बॉल, ना सिक्स…तरीही बांगलादेशी बॉलरचे एका बॉलमध्ये दिल्या ७ रन्स, जाणून घ्या कसं

न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात बाजी मारत बांगलादेशने कसोटी मालिकेची दणक्यात सुरुवात केली. मैदानात आपल्या लढाऊ वृत्ती आणि अतरंगी सेलिब्रेशन स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेल्या बांगलादेशी टीमचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. ख्राईस्टचर्च येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशी बॉलरने ना नो बॉल टाकला ना समोरच्या फलंदाजाने त्यावर सिक्स मारली. परंतू असं असतानाही एका बॉलमध्ये ७ […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 01:21 PM • 09 Jan 2022

follow google news

न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात बाजी मारत बांगलादेशने कसोटी मालिकेची दणक्यात सुरुवात केली. मैदानात आपल्या लढाऊ वृत्ती आणि अतरंगी सेलिब्रेशन स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेल्या बांगलादेशी टीमचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. ख्राईस्टचर्च येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशी बॉलरने ना नो बॉल टाकला ना समोरच्या फलंदाजाने त्यावर सिक्स मारली. परंतू असं असतानाही एका बॉलमध्ये ७ धावा काढल्या गेल्या.

हे वाचलं का?

पहिल्या दिवशी लंच सेशननंतरच्या पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर हा मजेशीर प्रसंग मैदानात घडला. एबादत हुसैनच्या बॉलिंगवर न्यूझीलंडच्या विल यंगला मोठं जिवदान मिळालं. यंगच्या बॅटला कड घेऊन गेलेला सोपा कॅच बांगलादेशी फिल्डरने सोडला. मिळालेल्या संधीचा फायदा घेत लॅथम आणि यंग जोडीने ३ रन्स धावून काढल्या. परंतू जखमेवर मीठ चोळण्याचा खरा प्रत्यय तर पुढेच आला.

फाईन लेग पोजिशनवर उभ्या असलेल्या नरुल हसनने नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने बॉल फेकला. यावेळी बांगलादेशी फिल्डर हा बॉल रोखण्यात अयशस्वी ठरल्यामुळे बॉल ओव्हरथ्रो होऊन थेट सीमारेषेच्या पार केला. अशा पद्धतीने हुसैनच्या एकाच बॉलवर न्यूझीलंडने ७ धावा काढल्या.

मालिकेत १-० अशी आघाडी घेतलेल्या बांगलादेशने ख्राईस्टचर्च कसोटी सामन्यात टॉस जिंकत पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. लॅथम आणि यंग जोडीने पहिल्या विकेटसाठी १४८ धावांची भागीदारी केल्यानंतर शोरिफुल इस्लामने ही जोडी फोडली. ५४ धावांवर विल यंग माघारी परतला. परंतू टॉम लॅथमने बांगलादेशी बॉलर्सचा समाचार घेत आपलं शतक झळकावलं.

    follow whatsapp