IND vs AFG : रोहित शर्माची तुफान आतशबाजी! भारताने पाडला रेकॉर्डसचा पाऊस

मुंबई तक

11 Oct 2023 (अपडेटेड: 26 Oct 2023, 01:51 PM)

भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्माच्या बॅटने झंझावाती खेळी करत संघाला 8 विकेटने विजय मिळवून दिला. यानंतर आता भारतीय संघाला 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये पाकिस्तानविरुद्ध तिसरा सामना होणार आहे.

world cup 2023 india beat afghanistan rohit sharma virat kohli naveen ind vs afg match analysis world cup records

world cup 2023 india beat afghanistan rohit sharma virat kohli naveen ind vs afg match analysis world cup records

follow google news

IND VS AFG, World Cup 2023: भारतीय क्रिकेट टीमची सध्याची परिस्थिती अगदी जोमात आहे. कारण एकदिवसीय विश्वचषक 2023 (World Cup 2023) च्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाला (IND VS AFG) पराभूत केले ल्यानंतर आता अफगाणिस्तान संघाला त्यांना दिल्लीत (Delhi) पराभूत करण्यासाठी सज्ज झाला आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) बॅटने झंझावाती खेळी करत संघाला 8 विकेटने विजय मिळवून दिला. भारतीय संघाला 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये पाकिस्तानविरुद्ध तिसरा सामना खेळायचा आहे.

हे वाचलं का?

आक्रमक फलंदाजी

या सामन्यात 273 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. त्या भारतीय संघाला रोहित आणि इशान किशनने जोरदार सुरुवात करुन दिली. या सामन्यात दोघांमध्ये 156 धावांची भागीदारी झाली. तर ईशान मात्र 47 धावा करून बाद झाला. तर रोहितने आक्रमक फलंदाजी केली. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने 84 चेंडूत 131 धावांची खेळी केली. यावेळी त्याने 5 षटकार आणि 16 चौकार लगावले. रोहितच्या खेळीमुळे भारतीय संघाने अवघ्या 35 षटकांतच 2 गडी गमावून सामना जिंकला आहे. अफगाणिस्तान संघाला मात्र आपला प्रभाव टिकवता आला नाही. स्टार फिरकीपटू असलेला राशिद खानने मात्र प्रयत्न केले मात्र तोही हा सामना वाचवू शकला नाही. त्याच रशिदने राशिदने २ बळी घेतले.

हे ही वाचा >> क्रिकेटर रिझवानने उघड-उघड सांगितलं माझा Gaza ला पाठिंबा, ICC कारवाई करणार?

वर्ल्ड कपमध्येही सर्वाधिक शतके

या सामन्यातील या खेळीमुळे रोहित शर्माने शतक, षटकार आणि धावा अशा अनेक बाजूने अनेक विक्रम केले आहेत. या सामन्यातील जबरदस्त खेळीमुळे रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरला आहे. तर रोहित वनडे वर्ल्ड कपमध्येही सर्वाधिक शतके झळकावणारा खेळाडू ठरला आहे.

ऐतिहासिक विक्रम

या सामन्याच्या निमित्ताने रोहितने एकाच सामन्यात अनेक ऐतिहासिक विक्रम केले. एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक 7 शतके झळकावणारा तो जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने सचिन तेंडुलकरचाही विक्रम मोडला आहे. तसेच, रोहित विश्वचषकात सर्वात जलद 1000 धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. रोहित आणि डेव्हिड वॉर्नरने समान 19 डावात हजार धावा केल्या.

विश्वचषकात सर्वाधिक शतकांचा विक्रम

7 – रोहित शर्मा
6 – सचिन तेंडुलकर
5 – रिकी पाँटिंग
५ – कुमार संगकारा

एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक शतके

49 – सचिन तेंडुलकर
47 – विराट कोहली
31 – रोहित शर्मा
30 – रिकी पाँटिंग
28 – सनथ जयसूर्या

हे ही वाचा >> ललित पाटील ड्रग्ज प्रकरण! अवघ्या पोलिसांना गुंगारा देणारे आरोपी पाटील बंधू कोण?

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात अफगाणिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट गमावून 272 धावा केल्या. यामध्ये कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने 80 धावांची शानदार खेळी केली. तर अजमतुल्ला उमरझाईने 62 धावा केल्या. भारताकडून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने 39 धावांमध्ये 4 बळी घेतले. तर हार्दिक पांड्याने 2 बळी घेतले. कुलदीप यादव आणि शार्दुल ठाकूर यांना प्रत्येकी 1 असे यश मिळाले. भारत आणि अफगाणिस्तान संघ एकदिवसीय सामन्यात 4 वेळा एकमेकांशी भिडले आहेत. त्यामध्ये भारत तीन वेळा जिंकला आहे, तर एक सामना बरोबरीत राहिला आहे. त्याचबरोबर विश्वचषक स्पर्धेतील दोन्ही संघांमधील हा दुसरा सामना होता.

    follow whatsapp