WPL : पोरींनी पहिल्याच फटक्यात केली कमाल… IPL मध्ये दिग्गजांनाही नव्हतं जमलं

मुंबई तक

08 Mar 2023 (अपडेटेड: 30 Mar 2023, 11:06 AM)

मुंबई : महिला प्रीमियर लीग (WPL) T20 टूर्नामेंटच्या पहिल्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सची धडाकेबाज कामगिरी कायम आहे. पहिल्याच सामन्यात गुजरात जायंट्सचा १४३ धावांनी धुव्वा उडवल्यानंतर मुंबईच्या संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) ९ गडी राखून पराभव केला. यामुळे मुंबई इंडिनन्सचा संघ सध्या फॉर्मात असल्याचं पाहायला मिळतं आहे. (The all-round performance of Caribbean player Haley Mathews is in […]

Mumbaitak
follow google news

मुंबई : महिला प्रीमियर लीग (WPL) T20 टूर्नामेंटच्या पहिल्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सची धडाकेबाज कामगिरी कायम आहे. पहिल्याच सामन्यात गुजरात जायंट्सचा १४३ धावांनी धुव्वा उडवल्यानंतर मुंबईच्या संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) ९ गडी राखून पराभव केला. यामुळे मुंबई इंडिनन्सचा संघ सध्या फॉर्मात असल्याचं पाहायला मिळतं आहे. (The all-round performance of Caribbean player Haley Mathews is in the headlines.)

हे वाचलं का?

दरम्यान, मुंबई इंडियन्सच्या या विजयात कॅरेबियन खेळाडू हेली मॅथ्यूजची अष्टपैलू कामगिरी चर्चेत आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर २४ वर्षीय हेली मॅथ्यूजने ऑफ-स्पिन गोलंदाजीच्या जोरावर आधी आरसीबीविरुद्ध २८ धावांत ३ बळी घेतले. त्यानंतर १५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईसाठी सलामीवीर म्हणून ७७ धावांची (३८ चेंडूत) दमदार खेळी केली. तिने नाबाद खेळीत १३ चौकार मारले आणि एक षटकारही लगावला. याच अष्टपैलू कामगिरीमुळे हेली मॅथ्यूजने एक मोठा विक्रम नावावर केला आहे.

WPL 2023 : स्पॉन्सरच नाही! महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या लेकीने हातानेच लिहिले नाव…

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) चौथ्या हंगामात जो विक्रम पाहायला मिळाला तो महिला प्रीमियर लीगच्या (डब्ल्यूपीएल) पहिल्याच सिझनमधील चौथ्या सामन्यात बनला आहे.

कोणता आहे हा रेकॉर्ड?

एका सामन्यात कोणत्याही खेळाडूने ७५ किंवा त्याहून अधिक धावा किंवा ३ हुन अधिक बळी घेण्याचा हा विक्रम आहे. या विक्रमाबद्दल बोलताना हेली मॅथ्यूजने डब्ल्यूपीएलमध्ये हा विक्रम केला आहे. २०११ मध्ये आयपीएलमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचा रेकॉर्ड बनला होता. किंग्स इलेव्हन पंजाब (KXIP) कडून खेळताना पॉल व्हॅल्थाटीने डेक्कन चार्जर्सविरुद्ध ७५ धावा काढण्यासोबतच ४ विकेट्सही घेतल्या होत्या.

यापूर्वी कोणाच्या नावावर आहे हा विक्रम?

एकाच सामन्यात ७५+ आणि ३+ विकेट

  • पॉल व्हॅल्थटी KXIP, २०११

  • ख्रिस गेल RCB, २०११

  • शेन वॉटसन, RR २०११

  • युवराज सिंग RCB, २०१४

  • WPL हेली मॅथ्यूज MIW, २०२३

WPL : RCB ची महिला आयपीएलमध्येही वाईट दशा… लोटपोट हसवणारे मीम्स व्हायरल

२०२३ साली मुंबई इंडियन्सने महिला प्रीमियर लीग लिलावात अष्टपैलू हेली मॅथ्यूजसाठी ४० लाख रुपये मोजले आहेत. मॅथ्यूजने आतापर्यंत विंडीजसाठी ७५ एकदिवसीय सामन्यात १९१५ धावा, ८९ विकेट्स आणि ८२ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात १५८१ धावा आणि ७८ विकेट्स घेतल्या आहेत.

    follow whatsapp