Yashasvi Jaiswal : यशस्वी पुन्हा चमकला! शिखर धवनला पछाडलं, घडवला इतिहास

मुंबई तक

• 01:51 AM • 05 Mar 2023

देशांतर्गत क्रिकेटमध्ये 21 वर्षीय युवा फलंदाज यशस्वी जयस्वालने आपल्या खेळीने जबरदस्त विक्रम केला. यशस्वीने मध्य प्रदेशविरुद्ध इराणी चषक सामन्यात द्विशतक झळकावल्यानंतर दुसऱ्या डावात शतक झळकावलं. याआधी इराणी चषकाच्या सामन्यात द्विशतक आणि शतक झळकावण्याचा पराक्रम कोणीही केला नव्हता. शिखर धवन आणि हनुमान विहारी यांनी दोन्ही डावात शतकं झळकावली असली, तरी त्यांना द्विशतक आणि शतक झळकावता आलं […]

Mumbai Tak
Google CTA

हे वाचलं का?

देशांतर्गत क्रिकेटमध्ये 21 वर्षीय युवा फलंदाज यशस्वी जयस्वालने आपल्या खेळीने जबरदस्त विक्रम केला.

यशस्वीने मध्य प्रदेशविरुद्ध इराणी चषक सामन्यात द्विशतक झळकावल्यानंतर दुसऱ्या डावात शतक झळकावलं.

याआधी इराणी चषकाच्या सामन्यात द्विशतक आणि शतक झळकावण्याचा पराक्रम कोणीही केला नव्हता.

शिखर धवन आणि हनुमान विहारी यांनी दोन्ही डावात शतकं झळकावली असली, तरी त्यांना द्विशतक आणि शतक झळकावता आलं नाही.

यशस्वी जयस्वाल हा इराणी चषकाच्या एका सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.

यशस्वीने शिखर धवनला मागे टाकलं आहे. शिखर धवनने 332 धावा केल्या होत्या. यशस्वीने 213 आणि 144 धावांची खेळी खेळली आहे.

भारताकडून खेळलेल्या यशस्वीचा हा 15 वा फर्स्ट क्लास सामना होता. त्याने एकूण 9 शतकं झळकावली आहेत.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा