बेडरुममध्ये लावा 'हे' फोटो, तुमचा पार्टनर होईल प्रचंड रोमाँटिक
Astrology tips for bedroom: बेडरूम ही पती-पत्नीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची जागा असतं. कारण इथेच त्या दोघांमधील नातं दृढ होतं. अशावेळी बेडरुममध्ये कोणत्या प्रकारचे फोटो असायला हवेत हे आपण ज्योतिषशास्त्रांच्या माध्यमातून जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

मुंबई: घरातील बेडरुम हे जोडप्यांसाठी प्रेम, विश्वास आणि जवळीक वाढवणारं खास ठिकाण मानलं जातं. ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार, बेडरुममध्ये लावलेले फोटो किंवा चित्रं हे पती-पत्नीमधील नातेसंबंधांवर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव टाकू शकतात. ज्योतिषतज्ज्ञांच्या मते, योग्य फोटोंच्या निवडीमुळे जोडप्यांमधील प्रेम आणि समंजसपणा वाढतो, तर चुकीच्या चित्रांमुळे तणाव आणि भांडणंही उद्भवू शकतात. जाणून घ्या, ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून बेडरुममध्ये कोणते फोटो लावावेत आणि कोणते टाळावेत.
बेडरूममध्ये लावा 'हे' फोटो
1. राधा-कृष्ण किंवा लक्ष्मी-नारायण यांचे चित्र:
ज्योतिषशास्त्रात राधा-कृष्ण हे प्रेम आणि भक्तीचं प्रतीक मानलं जातं. बेडरुममध्ये त्यांचं चित्र लावल्याने जोडप्यांमध्ये रोमँटिक भावना आणि एकमेकांप्रती समर्पण वाढतं. त्याचप्रमाणे लक्ष्मी-नारायण यांचं चित्र समृद्धी आणि सौहार्द वाढवतं. हे चित्र उत्तर-पूर्व दिशेला लावणं शुभ मानलं जातं.
2. जोडप्याचा आनंदी फोटो:










