Vastu Dosh : वास्तु दोषासाठी कोणत्या गोष्टी असतात जबाबदार? यामागचं सत्य वाचून थक्कच व्हाल
Vastu Dosh : वास्तु दोषसाठी एखादाच व्यक्ती जबाबदार नसतो. हा वास्तु दोष घरातील वस्तू, दिशा आणि वास्तु नियमांच्या उल्लंघनामुळे निर्माण होतो.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

वास्तु दोषाची नेमकी कारणे कोणती ?

वास्तु दोषसाठी एखादाच व्यक्ती जबाबदार नसतो

कोणत्या गोष्टी असतात वास्तु दोषासाठी जबाबदार?
Vastu Dosh : वास्तु दोषसाठी एखादाच व्यक्ती जबाबदार नसतो. वास्तु दोष घरातील वस्तू, दिशा आणि वास्तु नियमांच्या उल्लंघनामुळे निर्माण होतो. वास्तु शास्त्रानुसार, चुकीच्या दिशेला घर बांधणं, महत्त्वाच्या गोष्टी योग्य जागेवर नसणे किंवा नकारात्मक उर्जा निर्माण करणाऱ्या गोष्टीही वास्तु दोषाचं कारण बनू शकतात.
वास्तु दोषाचे कारण
1) चुकीच्या दिशेला घर बांधणं
वास्तु शास्त्रात घराची दिशा आणि घराच्या सजावटीला खूप महत्त्वपूर्ण मानलं जातं. जर घर चुकीच्या दिशेला बांधलं, तर ते वास्तु दोषाचं कारण बनू शकतं
2) महत्त्वाच्या गोष्टी चुकीच्या ठिकाणी ठेवणे
किचन, बेडरूम, पूजा स्थळ आणि अन्य महत्त्वपूर्ण गोष्टींना योग्य दिशेला न ठेवल्याने वास्तु दोष निर्माण होऊ शकतो.

हे ही वाचा >> Maharashtra Board SSC Result 2025 : 10 वीच्या निकालाची तारीख लवकरच, रोल नंबर 'असा' करा डाऊनलोड
3) नकारात्मक उर्जा निर्माण करणाऱ्या गोष्टी
घरात पसरलेलं सामान, तुटलेलं फर्निचर किंवा नकारात्मक उर्जा निर्माण करणाऱ्या गोष्टींमुळेही घरात वास्तु दोष निर्माण होऊ शकतो.
4) दिशांच्या नियमांचं उल्लंघन
वास्तुशास्त्रानुसार, घरातील दिशांचे वेगवेगळे नियम असतात. या नियमांचं उल्लंघन केल्यानेही घरात वास्तु दोष निर्माण होतो. वास्तु दोष घर बांधणे आणि दिशांच्या नियमांचं उल्लंघन केल्याने निर्माण होतो. कोणत्याही एका व्यक्तीमुळे अशाप्रकारचा दोष निर्माण होत नाही. वास्तु दोषामुळे घरातील वातावरणावर वाईट परिणाम होऊ शकतो.