सूर्य-चंद्राची युती अन् दुर्मीळ योग, 'या' राशींच्या आयुष्यात होणार मोठा उलटफेर

मुंबई तक

ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांच्या चालीत झालेल्या बदलामुळे अनेक महत्त्वाचे योग निर्माण होतात. द्रिक पंचांगानुसार 4 जून रोजी सायंकाळी6 वाजून 09 मिनिटांनी असाच एक विशेष 'वैधृती योग' सुरू होत आहे.

ADVERTISEMENT

Vaidhriti Yog 2026
Vaidhriti Yog 2026
google news

Vaidhriti Yog 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांच्या चालीत झालेल्या बदलामुळे अनेक महत्त्वाचे योग निर्माण होतात. द्रिक पंचांगानुसार 4 जून रोजी सायंकाळी6 वाजून 09 मिनिटांनी असाच एक विशेष 'वैधृती योग' सुरू होत आहे. सूर्य आणि चंद्राच्या युतीमुळे निर्माण होणारा हा योग सर्व बारा राशींवर प्रभाव पाडेल, परंतु काही विशिष्ट राशींसाठी हा काळ अत्यंत शुभ आणि फायदेशीर मानला जात आहे.

'या' राशींच्या नशीबात आहे खास योग

मेष : या राशीच्या लोकांसाठी धनलाभ आणि करिअरमध्ये प्रगतीचे योग आहेत. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल, वरिष्ठ अधिकारी प्रभावित होतील आणि बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. 

सिंह : या राशीच्या लोकांच्या आत्मविश्वासात मोठी वाढ होईल. त्यांना समाज आणि कामाच्या ठिकाणी नवी जबाबदारी किंवा पद मिळू शकते, तसेच व्यवसायात नवीन फायदेशीर करार होऊ शकतात.

हे ही वाचा : बीड : सिनेमाला लाजवेल असा कट! मर्डर मिस्ट्रीचा पोलिसांकडून उलगडा

तूळ : या राशीच्या लोकांसाठी हा काळ सकारात्मक बदल घेऊन येईल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळेल, उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण झाल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि प्रेमसंबंधांमध्ये गोडवा येईल. 

हे वाचलं का?