दहा महिने शौचालयात डांबलेल्या विवाहितेसोबत काय घडलं?

मुंबई तक

एका 32 वर्षीय महिलेसोबत भयानक घटना घडलीये. तिच्या नवऱ्याने आणि सासू-सासऱ्याने तिला दहा महिने शौचालयात डांबून ठेवले. यानंतर काय घडलं, जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

दहा महिने शौचालयात डांबले अन् नंतर...

point

32 वर्षीय विवाहितेसोबत काय घडलं?

Crime News : घरगुती हिंसाचाराची एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका 32 वर्षीय विवाहित महिलेला तिच्या सासरच्या मंडळींनी तब्बल 10 महिने एका शौचालयात कोंडून ठेवल्याचा आणि तिचा छळ केल्याचा आरोप आहे. केंद्रीय विद्यालयात शिक्षक असलेल्या पतीसह सासू-सासऱ्यांनी या महिलेवर काठ्या आणि बाटल्यांनी गंभीर अत्याचार केले. हा अमानुष प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. उत्तराखंडच्या डेहराडूनमधील ही घटना आहे.

सुशिक्षित वाटणाऱ्या कुटुंबाचा खरा चेहरा समोर

पीडित महिलेचे वडील, जे 33 वर्षे सैन्यात सेवा बजावून निवृत्त झालेले हवालदार आहेत, त्यांनी 26 मे रोजी आपल्या मुलीची सासरच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर त्यांनी सोमवारी (1 जून) संध्याकाळी पोलिसांत रीतसर तक्रार दाखल केली. वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, 2024 मध्ये हा विवाह झाला होता. सुरुवातीला सुशिक्षित वाटणाऱ्या या कुटुंबाचा खरा चेहरा लग्नाच्या काही महिन्यांतच समोर आला. सासूने वेगवेगळ्या कारणांवरून महिलेचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली.

हे ही वाचा : Maharashtra Weather Update : मान्सूनचा वेग वाढला, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांत धडकणार?

शौचालयात डांबून ठेवले

हा छळ फेब्रुवारी 2025 मध्ये महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर पराकोटीला पोहोचला. सासरच्यांनी नवजात बालकांना आईपासून वेगळे केले आणि तिला साधे अंगावरचे दूधही पाजू दिले नाही. त्यानंतर जुलै 2025 पासून मे 2026 पर्यंत म्हणजेच जवळपास 10 महिने तिला खोलीत आणि शौचालयात डांबून ठेवण्यात आले. या काळात तिला जेवणात केवळ भात, कांदा, मिरची आणि मीठ दिले जात होते. तसेच दिल्लीहून घरी येणारा तिचा पती आणि सासू-सासरे तिला पाईप आणि काठ्यांनी बेदम मारहाण करत असत. मारहाणीदरम्यान तिचे केस उपटल्यामुळे तिच्या डोक्याला जखमा झाल्या आहेत, तर सासऱ्याने तिचे आक्षेपार्ह फोटो काढून तिला धमकावल्याचाही आरोप आहे.

हे ही वाचा : Pune Metro : हिंजवडीतील IT कंपनीने रातोरात गाशा गुंडाळला, अन् 700 तरुण रस्त्यावर

नवऱ्यासह  सासू-सासऱ्यावर गुन्हा दाखल

या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी पीडित महिलेच्या पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात महिलेच्या शरीरावर गंभीर जखमांचे व मारहाणीचे व्रण आढळून आले आहेत. सध्या पोलीस महिलेच्या सविस्तर वैद्यकीय अहवालाची वाट पाहत असून, त्यानंतर आरोपींवर पुढील कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
 

हे वाचलं का?