'कर्जमाफी सरसकट द्यायला हवी होती...' पंढरपुरात शेतकरी संतापले, नेमकं काय म्हणाले?
राज्य सरकारने शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. मात्र या योजनेतील काही अटींमुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. याविषयी पंढरपुरातील शेतकरी काय म्हणाले, जाणून घेऊया.
ADVERTISEMENT
Solapur Farmer News : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो, असे आश्वासन सरकारने दिले होते. त्यानंतर बच्चू कडू यांनी आंदोलनदेखील केलं होतं. अखेर सरकारने कर्जामाफी जाहीर केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत राज्यातील 55 लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करण्यात येणार आहे. मात्र या निर्णयानंतरही महाराष्ट्रातले शेतकरी नाराज आहेत.
कर्जमाफी नियम, निकषावरुन शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलीय. याशिवाय शेतमालास हमीभाव नसल्याने आम्हाला शेतमालास हमीभाव द्या आम्हीच सरकारला कामावर ठेवू म्हणत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. काही शेतकऱ्यांना निश्चितपणे आधार मिळालेला असला तरी आमचे पैसे लाडक्या बहिणीचे म्हणून देतात म्हणत महिला शेतकऱ्यांनीही नाराजी दर्शवली आहे. या कर्जमाफीविषयी पंढरपुरात शेतकऱ्यांनी काय सांगितले? त्याविषयीचा हा व्हिडिओ.









