भाजप-शिवसेनेत बंद दाराआड सुरु आहेत चर्चा?
मुंबई: 23 नोव्हेंबर 2019 या तारखेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळी परिमाणंच बदलून गेली. कारण याच दिवशी महाराष्ट्रात भल्या पहाटे एक अशी राजकीय घटना घडली होती की, ज्याने अवघा महाराष्ट्राला राजकीयदृष्ट्या हादरवून टाकलं होतं. होय… तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजभवनात झालेला शपथविधी. आता तुम्ही म्हणाल की, या विषयाची चर्चा आता का? तर […]
ADVERTISEMENT

मुंबई: 23 नोव्हेंबर 2019 या तारखेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळी परिमाणंच बदलून गेली. कारण याच दिवशी महाराष्ट्रात भल्या पहाटे एक अशी राजकीय घटना घडली होती की, ज्याने अवघा महाराष्ट्राला राजकीयदृष्ट्या हादरवून टाकलं होतं. होय… तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजभवनात झालेला शपथविधी. आता तुम्ही म्हणाल की, या विषयाची चर्चा आता का? तर त्याचं नेमकं कारण तुम्हाला पुढे समजलेच..
काहीही झालं तरी आपण राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार नाही. असं एकदा नव्हे तर तीन-तीनदा सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर 23 नोव्हेंबर 2019 रोजी थेट अजित पवार यांच्या पाठिंब्याने शपथविधी आटोपला होता. याच शपथविधीनंतर सत्तेसाठी काहीही केलं जाऊ शकतं यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं. आता या घटनेला बराच काळ उलटून गेला आहे. पण असं असताना याची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे ती सत्तेत असणाऱ्या शिवसेना आणि विरोधात असलेल्या भाजप नेत्यांच्या वक्तव्यांमुळे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना आणि भाजप यांच्यातील संबंध प्रचंड ताणले गेले होते. त्यातही भल्या पहाटेच्या शपथविधीच्या संपूर्ण राजकीय नाट्यानंतर यथावकाश महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. पण हे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपने त्यावर टीकेची झोड उठवलेली आहे. हे सरकार आपल्याच ओझ्याने सहा महिन्यांच्या आत पडेल असं भाजप नेते म्हणत होते. पण आता या सरकारने साधारण दोन वर्षांच्या जवळपास कालावधी पूर्ण केला आहे.
आता एवढा काळ उलटल्याने हे सरकार काही पडत नसल्याचं लक्षात आल्याने भाजपने राजकीय पटलावरील आपला मोहराच बदलून टाकला असल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत सरकार पडणार असं वक्तव्य करणारे भाजप नेते पुन्हा एकदा शिवसेनेला खुणावू लागल्याचं दिसत आहे. दुसरीकडे शिवसेनेने देखील भाजपला गोंजारण्यास सुरुवात केली आहे.