अयोध्येतून योगी, काशीतून पंतप्रधान मोदी; उत्तर प्रदेशात हिंदुत्वाचा दुहेरी प्रभाव

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राहुल श्रीवास्तव, इंडिया टुडे

पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यातही उत्तर प्रदेशची निवडणूक ही सर्वात महत्त्वाची मानली जाते आहे. एखाद्या सरावलेल्या खेळाप्रमाणे आता राजकारणाचा सारीपाट खेळला जातो आहे. पक्ष आणि नेते आता अशा राजकीय हालचाली करत आहेत ज्यामध्ये त्यांची राजकीय कौशल्य दिसून येतील. राजकारणातलं सगळं कसब पणाला लावताना हे नेतेमंडळी दिसत आहेत.

ऑगस्ट 1999 मध्ये उत्तर प्रदेशताल्या पहिल्या तीन टप्प्यातील मतदानाच्या काही दिवस आधी तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत कल्याण सिंह असं म्हणाले होते की ‘ये समय हवा बढाके आंधी बनाने का होता है. जिसले पाँव उखाडे तो उड जाएगा! याचा अर्थ असा की निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतरचा काळ हा वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याला वावटळ किंवा धुरळ्यात बदलण्याचा काळ असतो. अशात जे संतुलन गमावतात त्यांचं अस्तित्व संपतं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सध्या उत्तर प्रदेशात चर्चा आहे ती म्हणजे हवा भाजपविरोधी आहे ही. या चर्चेला बळ देण्याचं काम केलं ते समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी. गुरूवार संध्याकाळपर्यंत अखिलेश यादव यांनी भाजप सोडणाऱ्या नऊ आमदार आणि तनी मंत्र्यांना प्रवेश देत त्यांच्यासोबत छायाचित्र काढली. ही खेळी म्हणजे हवा भाजपच्या विरोधात आहे हे दाखवण्यासाठीच त्यांनी केली हे उघड आहे.

ADVERTISEMENT

आता उत्तर प्रदेशचा विकास कसा केला गेला हे सांगण्याचा पूर्णपणे प्रयत्न होईल. भाजप त्यासाठीची हवा तयार करेल. तसंच भाजप आणखी एक कार्ड समोर आणेल आणि ते मोठं करेल. ते आहे अयोध्या कार्ड. राम मंदिराचा मुद्दा हा भाजपने कायमच उचलून धरला आहे. आता निवडणुकीसाठी अयोध्या हे टेम्प्लेट मोठं करणार यात शंका नाही.

ADVERTISEMENT

माझ्या मतानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी योगी आदित्यनाथ यांच्या अयोध्येतून उमेदवारीला होकार दिला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाला तर हा डावपेच म्हणून हा सर्वात मोठा डाव ठरू शकतो यात काही शंका नाही.

मला तो दिवसही आठवतो ज्या दिवशी योगी आदित्यनाथ यांनी डार्क काळा चश्मा लावला होता आणि एका कारने लोकभवन या ठिकाणी जात होते. मी तो फोटो काढला होता आणि चकीतही झालो होतो. त्यावेळी भाजपचे आमदार, तसंच व्यंकय्या नायडू आणि भुपेंद्र यादव हे निवडणुकीचे भाजपचे निरीक्षक त्यांच्यासोबत थांबले होते. योगी आदित्यनाथ यांनी लोकसभेची खासदारकी सोडली आणि ते मुख्यमंत्री झाले.

योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेच्या जागेसाठी निवडणूक लढवली तर अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या (BSP) प्रमुख मायावती निवडणूक लढवत नसल्यामुळे ते उत्तर प्रदेशचे असे मुख्यमंत्री होतील ज्यांनी निवडणूक लढवली आहे. अशा प्रकारची खेळी मतदारांना आकर्षित करण्यासाठी महत्त्वाची ठरत असते.

9 नोव्हेंबर 2019 रोजी अयोध्येतील राम मंदिरासाठीची जमीन हिंदूंना सुपूर्द केल्याच्या सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आला. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन करण्यात आलं. मंदिर उभारणीला प्रत्यक्ष सुरूवात झाल्यानंतर आणि थाटात भूमिपूजन पार पडल्यानंतर पहिल्यांदाच उत्तर प्रदेशात निवडणूक होते आहे.

आत्तापर्यंत मंदिर वहीं बनाएंगाचा नारा होता. आता भाजप राम मंदिर तयार होतं आहे हे आश्वासन देऊन मतं मागणार आहे. यामुळे साहजिकच उत्तर प्रदेश निवडणुकीचा केंद्रबिंदू अयोध्या झाली आहे. तसंच हिंदुत्व हा मुद्दा तर महत्त्वाचा आहेच. योगींना अयोध्येतून तिकिट दिलं तर भाजपला त्यांचा अजेंडा आणखी बळकट करता येईल.

अयोध्येतील भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितलं की राम मंदिराचा मुद्दा हा भाजपसाठी महत्त्वाचा आहेच. तसंच आता मंदिराची उभारणी होते आहे. त्यामुळे मुद्दा मतदारांच्या मनात घर करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहेच. काशीचे मोदी आणि अयोध्येचे योगी हे कार्ड अत्यंत आश्वासक ठरू शकतं आणि त्यामुळे सत्ता पुन्हा काबीज करता येऊ शकते.

भगवी वस्त्र परिधान करणारे योगी आदित्यनाथ यांना संघाचा कायमचा मुद्दा असलेल्या आणि अजेंडा असलेल्या राम मंदिराच्या मुद्द्याशी थेट इन्स्टा लिंक मिळेल. योगी फ्रॉम अयोध्या याचा अर्थ ते संघाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होतील असाही होऊ शकतो.

2014 पूर्वी ते एक भाजप नेते मानले जात. मात्र त्यांची मूळं संघाशी जोडलेली नव्हती. वाजपेयी आणि अडवाणी यांचा काळ लक्षात घेता सध्याच्या भाजपने सांप्रदायिकतेमधला जो भाग वगळायचा होता तो वगळला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत, 2017 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत यासाठी काम करणाऱ्या जातीय धर्तीवर मुझफ्फरनगर दंगलीनंतरचे ध्रुवीकरण कमी झाले आहे हेदेखील विसरता येणार नाही.

हिंदुत्व हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो उत्तर प्रदेश जिंकण्यासाठी कामी येऊ शकतो हे पक्षाला माहित आहे. त्यामुळे भाजपसाठी राम मंदिर, अयोध्या, धर्म आणि हिंदुत्व हे सगळे मुद्दे या निवडणुकीत महत्त्वाचे असणार आहेत. केंद्र सरकारची गरीबांचा विकास साधणारी धोरणं, कायदा सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्री योगी यांनी ठेवलेला ट्रॅक रेकॉर्ड या आधारे मोदी आणि योगी अशा दुहेरी इंजिनाच्या शक्तीने उत्तर प्रदेश निवडणूक जिंकण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

हिंदुत्त्वाचा मुद्दा आत्ताचा नाही गेल्या काही वर्षांपासून चालत आला आहे. काशी, मथुरा आणि अयोध्या हे तिन्ही चर्चेचे विषय आहेत. ६ डिसेंबरला मथुरा येथील कृष्ण जन्म भूमी मंदिराशेजारी असलेल्या मशिदीत हिंदू धार्मिक विधी करण्याचाही उल्लेख केला होता. याच दिवशी 1992 मध्ये बाबरी मशीद पाडण्यात आली होती.

यापूर्वी, काही गटांनी मथुरा आणि काशी मशिदींना विवादांपासून कायदेशीर संरक्षण प्रदान करणाऱ्या पीव्ही नरसिंह राव सरकारने आणलेल्या 1991 च्या कायद्याच्या वैधतेला आव्हान दिले होते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री असताना मथुरेत मांस आणि मद्यविक्रीवर बंदी घातली होती. 13 डिसेंबर रोजी, पंतप्रधान मोदींनी नव्याने बांधलेल्या काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरच्या उद्घाटनासाठी वाराणसीला मोठा दौरा केला होता.

केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या काही वर्षांत अयोध्येवर भरपूर निधी खर्च केला आहे.त्याचप्रमाणे अयोध्येचा विकास साधण्यावर विशेष लक्ष दिले आहे. रामजन्मभूमी मंदिरापर्यंत पोहोचणारा रस्ता बांधण्यासाठी 300 कोटींची तरतूद, पर्यटन सुविधांच्या सुशोभिकरणासाठी 100 कोटी रुपये, 27 ग्रामीण रस्ते प्रकल्प, 114 विकास प्रकल्प आणि आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत बससाठी तरतूद करण्यात आली आहे.

अयोध्या दीपोत्सव” चा भाग म्हणून योगी आदित्यनाथ आपली दिवाळी अयोध्येत लाखो मातीचे पणत्या लावत आहेत. योगी आदित्यनाथ यांना अयोध्येतून रिंगणात उतरवले तर या प्रयत्नांची फळे त्यांना मिळावीत अशी भाजपची अपेक्षा आहे.

आरएसएसच्या एका ज्येष्ठ विचारवंताने सांगितले की, अयोध्या प्रतीकात्मकतेने भारलेली आहे. ते म्हणाले, “कोणताही हिंदू कधीही कृष्णराज म्हणत नाही कारण भगवान कृष्ण भगवद्गीतेचे प्रतिनिधित्व करतात. पण अयोध्या रामराज्याचे प्रतिनिधित्व करते. जर योगी आदित्यनाथ अयोध्या आणि उत्तर प्रदेश जिंकले तर त्यांना खूप काही मिळणार आहे.

मात्र असं असलं तरीही याला एक दुसरी बाजूही आहे. कोणत्याही उच्च पदाचा मुकुट हा काटेरी असतो. अयोध्या अपग्रेडच्या अनुषंगाने योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेश निवडणूक जिंकण्यात सिंहाचा वाटा उचलावा लागेल. तसं घडलं तरच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दृष्टीने ते हिताचं ठरेल.

(ब्लॉग लेखक राहुल श्रीवास्तव हे इंडिया टुडे ग्रुपमध्ये Nationals Affairs Editor या पदावर कार्यरत आहेत)

    follow whatsapp

    ADVERTISEMENT