नितेश राणे आणि आदित्य ठाकरे यांच्यातला संघर्ष नेमका कधी आणि कसा सुरू झाला?
आदित्य ठाकरे आणि नितेश राणे समोरासमोर आले. त्यानंतर दोघांमध्ये असं काही घडलं की आदित्य ठाकरेंनी थेट वरळी पोलीस स्टेशन गाठलं. त्यापाठोपाठ नितेश राणेंनीही आदित्य ठाकरेंच्या विरोधात काऊंटर कम्प्लेंट केली. तीदेखील त्याच वरळी पोलीस ठाण्यात. काय घडलं होतं या दोघांमध्ये काय होता तो किस्सा माहित आहे? चला जाणून घेऊ. नितेश राणेंच्या निलंबनाची मागणी करत सभागृहात घोषणाबाजी, […]
ADVERTISEMENT

आदित्य ठाकरे आणि नितेश राणे समोरासमोर आले. त्यानंतर दोघांमध्ये असं काही घडलं की आदित्य ठाकरेंनी थेट वरळी पोलीस स्टेशन गाठलं. त्यापाठोपाठ नितेश राणेंनीही आदित्य ठाकरेंच्या विरोधात काऊंटर कम्प्लेंट केली. तीदेखील त्याच वरळी पोलीस ठाण्यात. काय घडलं होतं या दोघांमध्ये काय होता तो किस्सा माहित आहे? चला जाणून घेऊ.
नितेश राणेंच्या निलंबनाची मागणी करत सभागृहात घोषणाबाजी, आदित्य ठाकरेंना ‘म्याव म्याव’ चिडवणं भोवणार?
आदित्य ठाकरे आणि नितेश राणे यांच्यात एक भांडण झालं होतं. नुकतंच हिवाळी अधिवेशन पार पडलं. त्यावेळी आदित्य ठाकरेंना उद्देशून नितेश राणे म्याव म्याव आवाज काढला त्यामुळे राजकीय वादळ उठलं. सभागृहातही याचे पडसाद उमटले. नितेश राणेंवर कारवाई करण्याचीही मागणी झाली. सभागृहाच्या बाहेर म्हणजेच अगदी रस्त्यावरही याचे पडसाद उमटले. सोशल मीडियावरही या सगळ्या प्रकरणी प्रतिक्रिया उमटल्या. या दोन नेत्यांमध्ये प्रत्यक्ष असा काहीतरी वाद होण्याची ही पहिली वेळ नव्हती. या दोन तरूण नेत्यांमध्ये असलेल्या वादाचं जे मूळ आहे ते त्यांच्या दोन्ही नेत्यांच्या नेतेच असलेल्या वडिलांमध्ये आहे.