दंगलीत घर जळालेल्या खेळाडूला जेव्हा MCA आधार देतं…

मुंबई तक

माजी मुंबईकर आणि टीम इंडियाचा ओपनर वासिम जाफरवर उत्तराखंड क्रिकेट संघटनेने संघात फक्त मुस्लीम खेळाडूंना प्राधान्य दिल्याचा आरोप केला. या गोष्टीवरुन गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा सुरु आहे. वासिमने पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडत…सर्व आरोप फेटाळून लावले आहेत आणि त्याने उत्तराखंडच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामाही दिला. आपल्या प्रदीर्घ करिअरमध्ये वासिमने मुंबई आणि विदर्भाचं प्रतिनिधीत्व केलं. क्रिकेट […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

माजी मुंबईकर आणि टीम इंडियाचा ओपनर वासिम जाफरवर उत्तराखंड क्रिकेट संघटनेने संघात फक्त मुस्लीम खेळाडूंना प्राधान्य दिल्याचा आरोप केला. या गोष्टीवरुन गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा सुरु आहे. वासिमने पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडत…सर्व आरोप फेटाळून लावले आहेत आणि त्याने उत्तराखंडच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामाही दिला. आपल्या प्रदीर्घ करिअरमध्ये वासिमने मुंबई आणि विदर्भाचं प्रतिनिधीत्व केलं. क्रिकेट हाच आपला धर्म मानणारा वासिम वयाच्या चाळीशीपर्यंत खेळत राहिला.

आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत वासिमने खेळामध्ये कधीही धर्म येऊ दिला नाही. अशा खेळाडूवर धर्माचे आरोप लावणं ही खरंच दुर्दैवी बाब आहे. मुंबई आणि मुंबई क्रिकेट संघाचं वातावरण हे नेहमी धर्मनिरपेक्ष राहिलं आहे. हिंदू, मुस्लीम, शिख, पारशी अशा अनेक धर्माच्या खेळाडूंनी मुंबईचं प्रतिनिधीत्व केलं. पण मैदानावर उतरल्यानंतर कधीही खेळाडूंचा धर्म त्यांच्यासोबत आला नाही. बाबरी मशिदीच्या पतनानंतर मुंबईत मोठ्या प्रमाणात धार्मिक दंगली उसळल्या. परंतू अशा खडतर परिस्थितीतही मुंबई क्रिकेट असोसिएशनने आपल्या संघाकडून खेळणाऱ्या एका मुस्लीम खेळाडूची काळजी घेतली होती.

ही गोष्ट आहे इक्बाल बद्रुद्दीन खान याची. १९८६ ते १९९९ अशा अंदाजे १२-१३ वर्षांच्या कारकिर्दीत इक्बाल स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई आणि आसामकडून खेळला. फटकेबाजी करणारी बॅटींग आणि ऑफ स्पिन बॉलिंग हे इक्बाल खानचं वैशिष्ट्य होतं. मुंबईकडून खेळताना इक्बाल सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांचा सहकारी होता. ३६ मॅचमध्ये जवळपास ३५ च्या सरासरीने इक्बालने १ हजार ३८६ रन्स काढल्या. १९९१ च्या मोसमात महाराष्ट्राविरुद्ध इक्बालने १०५ रन्सची इनिंग खेळली. रणजी क्रिकेटमधलं इक्बालचं हे एकमेव शतक होतं. याशिवाय १० अर्धशतकंही त्याच्या नावावर आहेत. मुंबईनंतर आसामकडूनही इक्बाल रणजी स्पर्धेत खेळला. त्याच्या ऑफस्पिनने ४९ विकेट घेतल्या. त्रिपुराविरुद्ध ३४ रन्समध्ये ५ विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.

बाबरी मशीद उध्वस्त झाल्यानंतर देशभरात दंगलीचा आगडोंब उसळला. मुंबईत देखील प्रचंड जाळपोळ, दंगे उसळले. गिरगाव हा तर मराठी-गुजराती बहुल वस्तीचा विभाग होता. चर्नी रोड, मरीन लाईन्स रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या बडा कब्रस्तानच्या आसपास मुस्लीम वस्ती होती. इक्बाल खानचं घरही याच भागात होतं. बाबरी पडल्यानंतर उसळलेल्या दंगलीत या मुस्लीम मोहल्ल्यालाही त्याची झळ बसली. इक्बालच्या घराचं नुकसान झालं, त्याच्या कुटुंबाची आबाळ झाली.

हे वाचलं का?

    follow whatsapp