Personal Finance: 1 एप्रिलपासून आनंदाची बातमी, नोकरदारांना होणार तब्बल 80,000 रुपयांचा फायदा
New Tax Regime: 1 एप्रिलपासून होणाऱ्या अनेक बदलांमध्ये, प्राप्तिकरातही बदल होणार आहे. 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्पात लागू केलेला नवीन Tax स्लॅब 1 एप्रिलपासून लागू होईल.
ADVERTISEMENT

Personal Finance Tips on New Tax Regime: मुंबई: 1 एप्रिलपासून म्हणजे नव्या आर्थिक वर्षापासून बऱ्याच गोष्टी बदलणार आहेत. टीडीएस व्यतिरिक्त, 1 एप्रिलपासून आयकरात मोठा बदल होणार आहे. 1 फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 12 लाख 75 हजार रुपयांपर्यंतच्या पगाराला आयकरातून सूट दिली आहे. यापेक्षा जास्त पगारावर आयकर स्लॅब लागू होतील. पूर्वी, जर आपण नवीन कर प्रणालीतील उत्पन्न कर स्लॅबबद्दल बोललो तर, 12 लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर 80 हजार रुपये कर भरावा लागत होता.
पूर्वी 3 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर शून्य होता. 3 लाख 1 रुपये ते ७ लाख रुपयांच्या उत्पन्नावर 5% आयकर, 7 लाख 1 रुपये ते 10 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 10% आयकर आणि 10 लाख 1 रुपये ते 12 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 15% आयकर भरावा लागणार होता. 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्पात प्राप्तिकराबाबत मोठी घोषणा करण्यात आली, ज्यामुळे मध्यमवर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.
हे ही वाचा>> Personal Finance तुम्हाला मिळतील 4 कोटी, फक्त SNP हा प्लॅन ठेवा लक्षात.. हाती येईल प्रचंड पैसा!
आयकराशी संबंधित हा नियम 1 एप्रिलपासून लागू होईल. डीफॉल्टनुसार, प्रत्येकाचा आयकर नवीन पद्धतीत असेल. जर एखाद्याला जुन्या कर पद्धतीत ते करायचे असेल तर त्यांना निवड करावी लागेल.
पर्सनल फायनान्सच्या (Personal Finance) या सीरीजमध्ये, आम्ही तुम्हाला 1 एप्रिलपासून लागू होणाऱ्या नवीन आयकराबद्दल आणि त्याच्या संपूर्ण कॅलक्यूलेशनबद्दल सांगणार आहोत. आता, 12 लाख 75 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना कोणत्याही आयकर कपातीशिवाय तुम्हाला पगार मिळेल. आता, त्यांना जुन्या कर प्रणालीत जावे लागणार नाही आणि उत्पन्न कर वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे लागणार नाहीत. ते त्यांच्या इच्छेनुसार आणि गरजेनुसार गुंतवणूक करू शकतील.
जुन्या कर प्रणालीतील आहेत हे Tax स्लॅब
जुन्या करप्रणालीत, अडीच लाख रुपयांपर्यंतच्या पगारावर कोणताही कर नाही. 2.5 ते 3 लाखांवर 5%, 3 ते 5 लाखांवर 5%, 5 ते 10 लाखांवर 20% आणि 10 लाखांपेक्षा जास्त रकमेवर 30% कर भरावा लागेल.










