पैसा-पाणी: भारताच्या GDP ची घोडदौड चौथ्या क्रमांकाच्या दिशेने, तरीही जनता गरीब का?
भारत या वर्षाच्या शेवटी जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहोत असा दावा केला जात आहे. मात्र, असं असलं तरी भारतातील बहुतांशी जनता गरीब असल्याचं दिसून येतं. हे असं काहा घडतंय याबाबत आपण पैसा-पाणी सदरातून जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भारत लवकरच जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार असल्याचा दावा
IMF च्या मते, दरडोई उत्पन्नात भारताचा 142 क्रमांक
विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपले दरडोई उत्पन्न पाच ते सहा पट वाढवावे लागेल
भारत सरकारने संपूर्ण मागील आर्थिक वर्षाचा आणि मार्चमध्ये संपलेल्या तिमाहीचा डेटा शुक्रवारी जाहीर केला. सरकार आणि विरोधी पक्ष दोघांनीही या आकडेवारीबाबत दावे केले आहेत. पैसा-पाणी या सदरात याच आकडेवारीबाबत जाणून घेऊयात.
सर्वप्रथम, GDP म्हणजे काय ते समजून घेऊया?
तुम्ही GDP ला अर्थव्यवस्थेचा परीक्षेचा निकाल म्हणू शकता. जीडीपीच्या आकडेवारीवरून अर्थव्यवस्थेची स्थिती कशी आहे याची कल्पना येते. चांगली किंवा वाईट... गेल्या संपूर्ण वर्षात आपल्या सर्वांच्या, सर्व कंपन्यांच्या आणि सरकारच्या खर्चाची बेरीज अंदाजे GDP बनवते. समजा, ही रक्कम गेल्या वर्षी (2023-24) ₹ 100 होती आणि या वर्ष (2024-25) ती ₹ 106.5 झाली, तर GDP वाढीचा दर हा 6.5% होता.
किती ट्रिलियन डॉलर्स?
सरकारचा दावा आहे की, भारतीय अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्स होईल, म्हणजे GDP ची बेरीज 5 ट्रिलियन डॉलर्स होईल. सध्या ही रक्कम 3.9 ट्रिलियन डॉलर्स आहे.
भारत कोणत्या क्रमांकावर आहे?
GDP च्या या बेरीजमध्ये अमेरिका आणि चीन आपल्यापेक्षा खूप पुढे आहेत, म्हणजेच ते पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत, त्यानंतर जर्मनी आणि जपानची पाळी येते. नीती आयोगाचे सीईओ घाईघाईने म्हणाले की, भारत चौथ्या क्रमांकावर आला आहे. आता सरकारचे आर्थिक सल्लागार म्हणत आहेत की, आपण वर्षाच्या अखेरीस जपानला मागे टाकू.










