Personal Finance: फ्लॅट की दुकान? कशामधून तुम्हाला मिळेल जास्त पैसा?

रोहित गोळे

Investment in Flat of Commercial Shop: जर उद्देश सुरक्षितता आणि स्थिरता असेल तर फ्लॅट हा चांगला पर्याय ठरू शकतो. मात्र नियमित कॅश फ्लो आणि जास्त भाडे उत्पन्न हे लक्ष्य असेल तर योग्य ठिकाणचे दुकान अधिक फायदेशीर ठरू शकते.

ADVERTISEMENT

personal finance flat or shop which one will yield higher returns
Personal Finance (प्रातिनिधिक फोटो)
google news

Personal Finance tips for Investment in Flat of Commercial Shop: घर, फ्लॅट, प्लॉट किंवा दुकान यापैकी कोणत्या मालमत्तेमध्ये गुंतवणूक करावी, हा प्रश्न अनेक गुंतवणूकदारांसमोर असतो. विशेषतः रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू इच्छिणारे मध्यमवर्गीय गुंतवणूकदार फ्लॅट आणि दुकान या दोन पर्यायांमध्ये अनेकदा संभ्रमात पडतात. दोन्ही मालमत्तांचे फायदे आणि जोखीम वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे गुंतवणुकीचा उद्देश, बजेट आणि अपेक्षित परतावा लक्षात घेऊन निर्णय घेणे आवश्यक ठरते.

फ्लॅटमध्ये गुंतवणुकीचे फायदे

फ्लॅट हा सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा सर्वात लोकप्रिय पर्याय मानला जातो. घरांच्या मागणीत सातत्य असल्याने फ्लॅट खरेदी करून भाडे उत्पन्न मिळवता येते.

फायदे

* सुरुवातीची गुंतवणूक तुलनेने कमी असते.
* गृहकर्ज सहज उपलब्ध होते.
* निवासी मालमत्तेची मागणी कायम असते.
* भाडेकरू मिळवणे तुलनेने सोपे असते.
* दीर्घकालीन भांडवली वाढीची संधी मिळते.

हे वाचलं का?