Personal Finance: Bigbasket ते Titan पर्यंत, प्रत्येक खरेदीवर मोठा नफा; Tata NeuPass खूप खास
Tata NeuPass: टाटा ग्रुपचा Tata NeuPass हा एक लॉयल्टी प्रोग्राम आहे जो यूजरला बिगबास्केट, क्रोमा, टाटा १ एमजी, टायटन आणि एअर इंडिया सारख्या कंपन्यांकडून खरेदीवर ५% पर्यंत NeuCoin देतो.
ADVERTISEMENT

Personal Finance Tips for Tata NeuPass: टाटा ग्रुपच्या कंपन्या जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात आहेत, दैनंदिन गरजांपासून ते लक्झरी सेवांपर्यंत. बिगबास्केटमधील किराणा सामान असो, टायटनमधील दागिने असो, टाटा १ एमजीची औषधे असो किंवा आयएचसीएल हॉटेल्समध्ये राहणे असो. जर तुम्ही या ब्रँड्समधून खरेदी केली आणि प्रत्येक वेळी रिवॅार्ड्स् मिळाले तर? Tata NeuPass याच कल्पनेवर आधारित आहे. हा टाटाचा लॉयल्टी प्रोग्राम आहे जो प्रत्येक खरेदीवर रिवाॅर्डस आणि विशेष फायदे देतो.
Tata NeuPass हा टाटा ग्रुपचा एक लॉयल्टी प्रोग्राम आहे जो यूजरला बिगबास्केट, क्रोमा, टाटा १ एमजी, टायटन आणि एअर इंडिया सारख्या कंपन्यांकडून खरेदीवर ५% पर्यंत NeuCoin देतो. प्रत्येक NeuCoin ची किंमत १ रुपये आहे आणि ती TataNeu अॅपवर किंवा पार्टनर ब्रँड्सवर रिडीम करता येते.
NeuPass म्हणजे काय?
Tata NeuPass हा एक प्रोग्राम आहे जो टाटा ग्रुपच्या विविध कंपन्यांकडून केलेल्या खरेदीवर NeuCoins देतो. प्रत्येक NeuCoin ची किंमत १ रुपये आहे आणि ती TataNeu अॅपवर किंवा पार्टनर ब्रँड्सच्या वेबसाइट/स्टोअर्सवर रिडीम करता येते. यामध्ये बिगबास्केट, क्रोमा, टाटा १ एमजी, एअर इंडिया, टायटन, वेस्टसाइड, कल्ट.फिट, आयएचसीएल, एअरएशिया इंडिया आणि टाटा क्लीक्यू हे प्रमुख ब्रँड समाविष्ट आहेत.
4 लेव्हल मेंबरशिप
NeuPass चे 4 स्तर आहेत: एक्सप्लोरर, इनसाइडर, एलिट आणि लेजेंड.










