Personal Finance: बिल्डरकडे नसतील ही कागदपत्रं तर अजिबात खरेदी करून नका तशा बिल्डिंगमध्ये दुकान!

रोहित गोळे

Commercial Shop Documents: दुकान खरेदी हा लाखो रुपयांचा व्यवहार असतो. त्यामुळे घाईगडबडीत निर्णय घेण्याऐवजी बिल्डरकडील जमीन, बांधकाम आणि मालकी हक्काशी संबंधित सर्व कागदपत्रांची सखोल पडताळणी करणे आवश्यक आहे.

ADVERTISEMENT

personal finance if builder does not have 10 documents do not buy a shop in that building under any circumstances
Personal Finance (प्रातिनिधिक फोटो)
google news

Personal Finance Tips for Commercial Shop Documents: आजकाल अनेकजण व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा गुंतवणुकीच्या उद्देशाने इमारतीमधील दुकान (Commercial Shop) खरेदी करतात. मात्र दुकान खरेदी करताना केवळ जागेचे लोकेशन, किंमत किंवा भविष्यातील नफा पाहून निर्णय घेणे धोकादायक ठरू शकते. बिल्डरकडे आवश्यक कायदेशीर कागदपत्रे आहेत की नाहीत, याची खात्री करणे तितकेच महत्त्वाचे आहे. अन्यथा भविष्यात मालकी हक्क, बँक कर्ज, बांधकाम परवानगी किंवा पुनर्विकासासंदर्भात गंभीर अडचणी निर्माण होऊ शकतात.

दुकान खरेदीपूर्वी कोणती कागदपत्रे तपासावीत?

1. जमीन मालकीची कागदपत्रे (Title Documents)

सर्वप्रथम ज्या जमिनीवर इमारत उभारली आहे त्या जमिनीचा मालकी हक्क बिल्डरकडे किंवा प्रकल्प विकसित करण्याचा अधिकार बिल्डरकडे आहे का, हे तपासणे आवश्यक आहे.

  • 7/12 उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड
  • विक्रीखत (Sale Deed)
  • विकास करार (Development Agreement)
  • पॉवर ऑफ अॅटर्नी यांची तपासणी करावी.

2. बांधकाम परवानगी (Building Approval)

महापालिका किंवा संबंधित नियोजन प्राधिकरणाने बांधकामास मंजुरी दिलेली असणे आवश्यक आहे.

  • मंजूर बांधकाम नकाशा (Sanctioned Plan)
  • Commencement Certificate (CC)
  • बांधकाम परवानगी आदेश पाहणे गरजेचे आहे.

3. रेरा नोंदणी (RERA Registration)

जर प्रकल्प रेरा कायद्याच्या कक्षेत येत असेल तर तो प्रकल्प रेरा नोंदणीकृत असणे बंधनकारक आहे.

हे वाचलं का?