Personal Finance: SIP मधून पर्सनल लोन फेडणं शहाणपणाचा निर्णय की मोठी Risk?

SIP and Personal Loan: लोक आता पर्सनल लोनचा EMI लवकर पूर्ण करण्यासाठी SIP हा एक नवीन पर्याय म्हणून विचारात घेत आहेत. ही रणनीती स्मार्ट तसेच धोकादायक देखील असू शकते, कारण ती पूर्णपणे बाजारातील परताव्यावर अवलंबून असते.

personal finance repaying personal loan through sip a wise move or a big risk
Personal Finance
social share
google news

Personal Finance Tips for SIP and Personal Loan: पर्सनल लोन घेतल्यानंतर, EMI चा भार बऱ्याचदा खिशावर बराच काळ पडतो. अशा परिस्थितीत, आजकाल एक नवीन ट्रेंड उदयास येत आहे, तो म्हणजे Systematic Investment Plan (SIPl) द्वारे वैयक्तिक कर्ज लवकर प्री-पेमेंट करणे. तज्ञांचा असा विश्वास आहे की ही रणनीती स्मार्ट आहे तसेच त्यात लपलेले धोके देखील आहेत.

या कल्पनेअंतर्गत, लोक त्यांचा EMI कमी करण्यासाठी कर्जाचा कालावधी वाढवतात. नंतर उर्वरित रक्कम दरमहा SIP मध्ये टाकली जाते. दीर्घकाळात, जर SIP चा परतावा कर्जाच्या व्याजदरापेक्षा जास्त झाला, तर त्या फंडमधून कर्ज लवकर परतफेड करता येते. तसेच अधिकचे पैसे देखील जमवता येतात.

याबाबत तज्ज्ञांते मत आहे की, एसआयपी वापरून पर्सनल लोन हे प्रीपेमेंट करणे हे नाविन्यपूर्ण आहे. इक्विटी मार्केटने सामान्यतः 12-14 टक्के परतावा दिला आहे, तर पर्सनल लोनचा व्याजदर 10-16 टक्के असतात. परंतु बाजार अस्थिर असू शकतो. म्हणून वेळेवर EMI भरत रहा आणि अतिरिक्त पैसे SIP मध्ये गुंतवा.

फायदे

  • जास्त परताव्याची शक्यता: जर बाजार चांगला चालला असेल, तर SIP कर्जावरील व्याजदरापेक्षा जास्त कमाई करू शकतात.
  • लिक्विडिटी कायम राहते: गरज पडल्यास SIP मधून पैसे लवकर काढता येतात.
  • कर लाभ: एक वर्षानंतर, तुम्हाला SIP मधून मिळणाऱ्या नफ्यावर कर सूट मिळू शकते.

जोखीम

  • बाजार जोखीम: इक्विटी गुंतवणुकीवरील परताव्यांची हमी दिली जात नाही.
  • शिस्त महत्त्वाची आहे: जर SIP वेळेवर गुंतवली नाही तर नफा कमी होऊ शकतो.
  • जास्त व्याजदर: पर्सनल लोनचा व्याजदर SIP परताव्यापेक्षा अनेकदा जास्त असतात.

SIP द्वारे कर्ज प्रीपेमेंट करणे तेव्हाच फायदेशीर ठरते जेव्हा गुंतवणूकदार दीर्घकाळ शिस्तबद्ध राहू शकतो आणि बाजारातील चढउतारांना तोंड देण्याची क्षमता बाळगतो. अन्यथा, थेट कर्जाची पूर्व-भरपाई हा एक सुरक्षित पर्याय आहे.

Personal Finance सीरीजमधील या बातम्याही वाचा:

1. Personal Finance: पेन्शनबाबत येऊ शकते एक मोठी आणि चांगली बातमी, आतापासूनच सगळा प्लॅन ठरवून ठेवा!

2. Personal Finance: 50 व्या वर्षीच व्हा निवृत्त, तरीही मिळेल दर महिन्याला 1 लाख रूपये.. SWP प्लॅन आहे तरी काय?

3. Personal Finance: तुमच्या मुलाच्या जन्मापासून SIP करा सुरू, मिळतील 1 कोटी.. 21x10x12 फॉर्म्युला आहे जबरदस्त

4. Personal Finance: घर खरेदी करावं की भाड्याने घ्यावं.. काय चूक, काय बरोबर? 'हा' फॉर्म्युला ठेवा लक्षात?

5. Personal Finance तुम्हाला मिळतील 4 कोटी, फक्त SNP हा प्लॅन ठेवा लक्षात.. हाती येईल प्रचंड पैसा!

6. Personal Finance: FD पेक्षा जास्त मिळतील पैसे, 'ही' जबरदस्त योजना तुम्हाला माहिती आहे का?

7. Personal Finance: जर तुम्हाला घरबसल्या PF चे पैसे हवे तर फक्त 'एवढंच' करा.., थेट तुमच्या खात्यात पैसे

8. गुड न्यूज: तुमचा घराचा हप्ता होणार कमी, EMI भरताना 'एवढे' पैसे वाचणार!

9. Personal Finance: शेअर मार्केटचा बाजारच उठला, आता करावं तरी काय?

10. Personal Finance: ATM वापरलं की, तुमचे पैसे कापले जाणार, 1 मे पासून येणार नियम पाहून ठेवा बरं!

11. Personal Finance: 50,000 रुपये पगार असलेली लोकंही बनू शकतात करोडपती, फक्त 300...

12. Personal Finance: EPFO कडून मोठा दिलासा, PF मधून काढता येणार 5 लाख... तेही थेट UPI आणि ATM वापरून!

13. Personal Finance: 500 रुपयांच्या मासिक SIP ने किती दिवसांत होऊ शकता कोट्यधीश? संपूर्ण गणित घ्या समजून

14. SIP सारखी जबरदस्त कमाई आणि FD सारखे दर महिन्याला पैसे, SWP प्लॅन नेमका काय?

15. Personal Finance: गुंतवणुकीवर किती पैसे मिळणार हे सत्य कोणीही सांगत नाही, 70 चा फॉर्म्युला तुम्हाला टाकेल हादरवून!

16. Personal Finance: LIC ची रक्कम किती असावी? 'हा' फॉर्म्युला खूप फायदेशीर

हे वाचलं का?

    follow whatsapp