Mumbai Rain: ठाणे, पालघरला ऑरेंज तर मुंबईत येलो अलर्ट.. जोरदार पाऊस बरसणार
Mumbai Rain Today: 4 सप्टेंबर 2025 रोजी मुंबई आणि MMRDA परिसरात जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यासाठी अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (MMRDA)परिसरात आज (4 सप्टेंबर 2025) रोजी हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे, तसेच मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. सविस्तर हवामान अंदाज आणि संबंधित माहिती जाणून घ्या
- पर्जन्यमान (पाऊस):
- मुंबई आणि एमएमआरडीए परिसरात (नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, वसई-विरार इत्यादी) मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
- सकाळी आणि दुपारी हलक्या सरींसह ढगाळ वातावरण राहील, तर संध्याकाळी आणि रात्री काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
- बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने पावसाची तीव्रता वाढू शकते, असे हवामान खात्याने नमूद केले आहे.
- हवेची आर्द्रता:
- आर्द्रता: 75% ते 85%
- दमट आणि उष्ण वातावरणामुळे राहील. कारण पावसाच्या खंडित स्वरूपामुळे तशा प्रकारचं हवामान असेल.
हे ही वाचा>> मुंबईची खबर: आता मुंबई ते रत्नागिरी पर्यंतचा प्रवास केवळ 5 तास... ‘ही’ सेवा पुढच्या महिन्यातच होणार सुरू!
- वाऱ्याचा वेग आणि दिशा:
- वारे पश्चिम/नैऋत्य दिशेकडून वाहतील.
- काही वेळा जोरदार वारे (गस्ट्स) 30 किमी/तासापर्यंत पोहोचू शकतात, विशेषत: पावसाच्या वेळी.
