काय सांगता! सोन्या-चांदीचे दर पुन्हा घसरले? 22 अन् 24 कॅरेट सोन्याच्या भावात किती रुपयांची झाली घट? जाणून घ्या
Today Gold Rate : श्रावण महिन्याची सुरुवात होण्याआधी सोन्याच्या किंमतीत खूप चढ-उतार झाल्याचं पाहायला मिळालं नाही. मागील काही दिवसांपासून सोन्याचे दर स्थिर असून त्यात किरकोळ बदल झाले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली वाढ?
22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?
मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?
Today Gold Rate : श्रावण महिन्याची सुरुवात होण्याआधी सोन्याच्या किंमतीत खूप चढ-उतार झाल्याचं पाहायला मिळालं नाही. मागील काही दिवसांपासून सोन्याचे दर स्थिर असून त्यात किरकोळ बदल झाले आहेत. आज शुक्रवारी 18 जुलै 2025 रोजीही देशातील प्रमुख बुलियन मार्केटमध्ये सोनं-चांदीचे दर फ्लॅट असल्याचं पाहायला मिळत आहे.
राजधानी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 99490 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 91140 रुपये झाले आहेत. चांदीच्या दरातही कोणतेच बदल झाले नाहीत. त्यामुळे एक किलो चांदीचे भाव 1,13,900 रुपयांवर स्थिर आहेत. अशातच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय आहेत, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर
मुंबई
मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 99490 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 91140 रुपये झाले आहेत.
पुणे
पुण्यातही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 99490 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 91140 रुपये झाले आहेत.










