Viral News: बॉयफ्रेंडने प्रपोज केल्यानंतर गर्लफ्रेंड थेट 100 फूट खोल दरीत पडली!
एका बॉयफ्रेंडने त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज करून अवघे काही क्षणही झाले नाही तोच त्यांच्यासोबत एक भयंकर घटना घडली. ज्यामध्ये तरूणीला तिचा जीव गमवावा लागला.
ADVERTISEMENT

Girlfriend Death: तुर्की: एका जोडप्यासोबत एक अशी घटना घडली आहे की, ज्याचा आपण कधी विचार देखील केला नसेल. त्याचं झालं असं की, एका मुलीला तिच्या प्रियकराने (Boyfriend) प्रपोज केलं. पण त्याचवेळी अचानक मुलीचा पाय टेकडीवरून घसरला आणि ती थेट 100 फूट खाली दरीतच कोसळली. हे प्रकरण तुर्कीचे आहे. (boyfriend proposed his girlfriend
after girl slips from cliff and dies in turkey)
नेमकी घटना काय?
येसिम डेमिर (वय 39 वर्ष) ही आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा क्षण कायम स्मरणात राहावा यासाठी तिचा बॉयफ्रेंड निजामेटिन गुरसु याच्यासोबत एका उंच टेकडीवर गेली होती. त्यांनी मावळत्या सूर्यासोबत एक छान फोटो देखील काढला. पण त्याचवेळी गर्लफ्रेंड येसिम हिचा अचानक टेकडीवरून पाय सरकला आणि ती थेट दरीत पडली. ही घटना 6 जुलै रोजी घडली.
तिच्या भावी पतीने तिला नुकतेच प्रपोज केले होते. यानंतर तो खाण्या-पिण्याच्या गोष्टी आणण्यासाठी आपल्या गाडीकडे गेला तेव्हा त्याला एक मोठी किंकाळी ऐकू आली. गुरसू धावत परत आला तेव्हा त्याला कळले की त्याची गर्लफ्रेंड ही टेकडीवरून खाली पडली आहे.
हे ही वाचा >> Pune Crime : ‘तुलाही गोळी घालेन’, पत्नी-पुतण्याच्या हत्येपूर्वी काय घडलं?
स्थानिक मीडियाशी बोलताना त्याने सांगितले की, दोघांनी एंगेजमेंटसाठी ही टेकडीवरची जागा निवडली होती. कारण त्यांना ही जागा रोमँटिक आहे असं वाटलं गुरसू म्हणाला, ‘प्रपोज केल्यानंतर आमच्या आठवणी रोमँटिक असाव्यात म्हणून या जागेची निवड केली होती. आम्ही थोडी दारू देखील प्यायलो. पण सगळं एकाच झटक्यात घडलं. तिचा तोल बिघडला आणि ती खाली पडली.’










