Chandrayaan3 चंद्राच्या उंबरठ्यावर! विक्रम लँडर-प्रोपल्शन मॉड्यूल कसं करणार काम?
चांद्रयान-3 यशस्वीरित्या चंद्राच्या पृष्ठभागाच्या जवळ पोहोचले आहे. आता साऱ्या जगाच्या नजरा त्याच्या लँडिंगवर आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) चांद्रयान-३ या चंद्र मोहिमेने चंद्राभोवती जवळपास गोलाकार प्रदक्षिणा केली आहे. चांद्रयान-3 चा विक्रम लँडर आज यानाच्या प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे होणार आहे.
ADVERTISEMENT

16 ऑगस्ट रोजी सकाळी चांद्रयान-3 ने चंद्राच्या पाचव्या कक्षेत प्रवेश केला. आता तुम्ही विचार करत असाल की जेव्हा प्रोपल्शन मॉड्यूल आणि विक्रम लँडरपासून वेगळे होतील, तेव्हा लँडर पुढचा प्रवास कसा करेल? चला तर मग याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
Lok Sabha Election : मोदीच येणार, पण…; नव्या सर्व्हेने भाजपचं वाढलं टेन्शन!
काय आहे संपूर्ण प्रक्रिया?
आज म्हणजेच 17 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता चांद्रयान-3 चे इंटिग्रेटेड मॉड्यूल दोन भागात विभागले जाईल. त्याचा एक भाग म्हणजे प्रोपल्शन मॉड्यूल आणि दुसरा भाग म्हणजे लँडर मॉड्यूल. उद्या (18 ऑगस्ट), प्रोपल्शन मॉड्यूल वेगळे झाल्यानंतर, प्रोपल्शन मॉड्यूल आणि लँडर मॉड्युल 100 किमी x 100 किमी कक्षेत फिरू लागतील. मात्र, दोघांमध्ये काही अंतर असेल जेणेकरून ते एकमेकांना भिडणार नाहीत. त्यानंतर 18 आणि 20 ऑगस्ट रोजी लँडरचे डीऑर्बिटिंग केले जाईल.
पृथ्वीवरून येणाऱ्या रेडिएशन्सचा अभ्यास करण्यासाठी प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेत 3 ते 6 महिने राहील तर लँडर-रोव्हर 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजून 47 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. येथे ते 14 दिवस पाण्याचा शोध घेतील यासह अन्य प्रयोग करणार आहेत.
प्रोपल्शनपासून विभक्त झाल्यानंतर, लँडर डीबूस्ट केले जाईल. म्हणजे त्याचा वेग कमी होईल. येथून चंद्राचे किमान अंतर 30 किमी असेल. 23 ऑगस्ट रोजी सर्वात कमी अंतरावरून चांद्रयानचे सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न केला जाईल. लँडर ३० किमी उंचीवरून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेपर्यंत ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असेल.