Mohan Bhagwat: जात आणि वर्ण व्यवस्था हा भूतकाळ, तो विसरून गेला पाहिजे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

जात आणि वर्ण व्यवस्था हा भूतकाळ आहे तो विसरून गेला पाहिजे असं महत्त्वाचं आणि मोठं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूरमध्ये केलं आहे. वर्ण-जाती यांची काय उपयुक्तता होती आणि त्यांच्यात आधी विषमता नव्हती वगैरे सगळं ठीक आहे. पण आज जर कुणी विचारलं की वर्ण-जातींबद्दल काय? तर तो एक भूतकाळ आहे हेच प्रत्येकाने विसरलं पाहिजे.

“सरसंघचालक मोहन भागवत हे राष्ट्रपिता आणि राष्ट्रऋषीसारखे” इमाम इलियासींचं वक्तव्य

नेमकं काय म्हणाले आहेत मोहन भागवत?

जाती आणि वर्णव्यवस्था आत्ताची गरज आहे का? हे जर कुणी विचारलं तर प्रत्येकाने तो आता भूतकाळ आहे आपण तो विसरून गेलं पाहिजे असंच उत्तर दिलं पाहिजे. ज्या कुठल्याही धोरणामुळे भेदाभेद निर्माण होतो असं धोरण, अशी व्यवस्था ही विसरली गेली पाहिजे. आपण काय केलं तर याचं समर्थन करत आलो. त्यासाठी हे पुरावे दिले. शास्त्र तर आहे, विद्वान लोकं काही खोटं बोललेले नाहीत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आपल्याला देण्यात आलेली प्रमाणं चुकीची नाहीत

वंशशास्त्राचं, जीवशास्त्राचं, समाज विज्ञानाचं जे ज्ञान आज आपल्याला आहे ते त्या काळी नव्हतं त्याकाळातली प्रमाणं आपल्या विद्वानांनी दिली आहेत. ती चुकीची नाहीत. कारण वस्तुस्थिती पाहिली तर लक्षात येतं की ही सगळी प्रमाणं हिंदू वैदिक सनातन धर्मातली आहेत. सगळे ग्रंथ धुंडाळून दिली आहेत. ही प्रमाणं भेदांच्या विरूद्ध बोलणारे सगळे आपण आदर्श मानतो असे सगळे लोक आहेत.

शास्त्रापेक्षाही लोक श्रेष्ठ आहेत

आणखी एक आपली परंपरा आहे.. ती म्हणजे शास्त्रानुसार चाललं पाहिजे. पण शास्त्र जर उपयोगी पडत नसेल तर लोकांनुसार चाललं पाहिजे. कारण शास्त्रापेक्षा लोक श्रेष्ठ आहेत. लोकव्यवहार हा जास्त महत्त्वाचा आहे. कारण लोक व्यावहारिक तडजोड करून बाजूला ठेवतात. आपल्याकडे इतके कायदे आहेत, ते सगळ्यांना मान्यही आहेत. मात्र काटेकोरपणे कायद्यायचं पालन करणारे किती लोक आहेत? सामूहिक प्रवृत्ती सोयीचं करण्याची दिसते की कायद्याने वागण्याची दिसते? त्यामुळेच शास्त्रापेक्षा लोक श्रेष्ठ आहे. पण एकमेकांची सांगड घातली जात नाही. त्यामुळे तिसरी गोष्ट आपल्याकडे आहे धर्म. धर्मानुसार चालावं.

ADVERTISEMENT

जो जोडतो तो धर्म

धर्म म्हणजे काय? तर जो जोडतो तो धर्म. प्रारंभी, मध्य आणि शेवटीसुद्धा आनंददायक जो असतो तो धर्म. जो कुठलाही अतिरेक करत नाही संतुलन शिकवतो तो धर्म आहे. प्रत्येकाचं स्वभाव ओळखून त्याचं कर्तव्य निर्धारित कऱणारा तो धर्म आहे. तो धर्म प्रमाण मानला पाहिजे. असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT