Gokul Dudh Sangh Meeting : बॅरिकेट्स तोडण्याचा… गोकुळच्या सभेत राडा, प्रकरण काय?
कोल्हापूर जिल्ह्याचे राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आज जोरदार राडा झाला. यावेळी सभेत गोंधळ होणार हे ध्यानात घेऊनच सभासदांना सभेत पाण्याच्या बॉटल घेण्यासही बंदी घालण्यात आली होती. यावेळी महाडिक गटाकडून सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
ADVERTISEMENT

kolhapur gokul dudh sangh meeting : गोकुळ जिल्हा दूध महासंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेवेळी प्रचंड गोंधळ उडाला. कागलमधील महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यात ही बैठक आयोजित केली गेली. पण, यावेळी महाडिक समर्थकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप गोंधळ घातला. यावेळी बॅरिकेट्स तोडण्याचा प्रयत्न महाडिक समर्थकांकडून झाला.
गोकुळ दूध महासंघाच्या बैठकीआधीच महाडिक गटाच्या वतीने सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले गेले. सकाळी सभा सुरू झाल्यानंतर महाडिक गटाच्या सभासदांनी गर्दी केली. सत्ताधाऱ्यांनी सर्वसाधारण सभेत जे ठरावधारक बसवलेत, ते बोगस असल्याचा आरोप करण्यात आला.
बॅरिकेट्स तोडण्याचा प्रयत्न, गेटवरून उड्या
सभासदांना प्रवेश देण्यासाठी रांगा लावल्या गेल्या. महत्त्वाचं म्हणजे पाण्याच्या बाटल्याही आत नेण्यास बंदी घालण्यात आली. यावरून महाडिक गटाचे सभासद आक्रमक झाले. प्रचंड फौजफाटा लावण्यात आला होता. पण, महाडिक समर्थकांनी बॅरिकेट्स तोडण्याचा प्रयत्न केला. काही सभासद गेटवरून उड्या मारून आत गेले.
शौमिका महाडिक म्हणाल्या…
गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी सतेज पाटील गटावर टीका केली. त्या म्हणाल्या, “आतमध्ये जे सभासद आहेत, ते निम्म्यापेक्षा जास्त बोगस आहेत. झेरॉक्स कॉपी घेऊन आलेले आहेत. मला असंही सांगण्यात आलं की, इथेच त्यांना झेरॉक्स वाटण्यात आले. त्यामुळे आतले निम्मे ठरावधारक बोगस आहेत.”










