Govind Pansare यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सात वर्षांनी ATS कडे, बॉम्बे हायकोर्टाचा निर्णय

गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवण्यात आला आहे, बॉम्बे हायकोर्टाने हा निर्णय दिला आहे
Govind Pansare murder probe transferred to ATS after 7 yrs
Govind Pansare murder probe transferred to ATS after 7 yrs

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सात वर्षांनी एटीएसकडे सोपवण्यात आला आहे. बुधवारी बॉम्बे हायकोर्टाच्या संमतीने एसआयटीकडून ATS कडे सोपवण्यात आला आहे. एसआयटीतले काही अधिकारी एटीएसला त्यांच्या तपासात सहकार्य करणार आहे. २०१५ पासून एसआयटीला पानसरे हत्या प्रकरणात अपेक्षित यश मिळत नसल्याने हा तपास एटीएसकडे सोपवण्यात यावा अशी विनंती पानसरे कुटुंबाने केली होती.

न्यायाधीश रेवती मोहित डेरे आणि न्यायाधीश शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने म्हटलं आहे की पानसरेंच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास एटीएएसकडे सोपवण्यात आला आहे. सात वर्षांपासून या प्रकरणाच्या तपासात एसआयटीला यश आलेलं नाही. त्यामुळे हा तपास एटीएसला सोपवला गेला आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात २० ऑगस्ट २०१३ ला हत्या करण्यात आली. १६ फेब्रुवारी २०१५ ला कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या त्यानंतर उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला.

कोल्हापूरातील या प्रकरणाच्या तपसा करण्यासाठी सरकारकडून विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापना करण्यात आली होती. मात्र इतकी वर्ष तपास करूनही एसआयटीच्या हाती काहीच लागलेलं नाही, त्यामुळे एसआयटीच्या तपासबाबत असमाधानी असलेल्या पानसरे कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज या प्रकरणावर सुनावणी झाली असून आता तपास एटीएसकडे सोपवण्यात आला आहे.

सात वर्षांनंतर देखील तपासात यश येत नव्हतं, अनेक दिवसांपासून याबाबत आम्ही मागणी करत होतो. आता हा तपास एटीएसकडे सोपवण्यात आला आहे, त्यामुळे अपेक्षा आहेत की हल्लेखोर सापडतील, अशी प्रतिक्रिया मेघा पानसरे यांनी दिली.

मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी महाराष्ट्र पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाला (CID) २०१३ मध्ये कार्यकर्ते नरेंद्र दाभोलकर हत्या आणि २०१५ मध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासात २०२० ते आत्तापर्यंत केलेल्या प्रगतीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि व्हीजी बिष्ट यांच्या खंडपीठाने सीआयडीला चार आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. एजन्सीने 2020 मध्ये शेवटचा स्टेटस रिपोर्ट सादर केला होता. गोविंद पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारी २०१५ ला गोळ्या झाडण्यात आल्या. २० फेब्रुवारीला उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला. मॉर्निंग वॉकला गेले असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेला आता सात वर्षे पूर्ण झाली आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in