रत्नागिरीत उदय सामंतांना ठाकरे गटाकडून धक्का; 3 ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल काय?

रत्नागिरी तालुक्यात मतदान झालेल्या तिन्ही ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडी तसेच ठाकरे गटाचे सरपंच विजयी
gram panchayat election result 2022 : uday samant rajan salvi
gram panchayat election result 2022 : uday samant rajan salvi

-राकेश गुडेकर, रत्नागिरी

आज जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये रत्नागिरीत उद्योग मंत्री आणि शिंदे गटातील नेते उदय सामंत यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाविकास आघाडीने जोरदार धक्का दिलाय. निवडणूक झालेल्या तिन्ही ग्रामपंचायतीमध्ये ठाकरे गट-महाविकास आघाडीचे सरपंच जिंकून आले आहेत.

रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव, फणसोप, पोमेंडी बुद्रुक आणि चरवेली या चार ग्रामपंचायतीकरीता सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा करण्यात आली. यापैकी चरवेली ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्यात आली. तर प्रतिष्ठेच्या बनलेल्या शिरगावमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे गट महायुती होती. मात्र शिरगावमध्ये महाविकास आघाडीचे सरपंच निवडून आले आहेत.

ग्रामपंचायत निवडणूक : राजन साळवींनी वर्चस्व राखलं

शिरगावमध्ये महाविकास आघाडीच्या फरिदा काझी विजयी झाल्या आहेत. तर फणसोपमध्ये ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी थेट लढत होती. या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या राधिका साळवी सरपंच पदी निवडून आल्या आहेत. तर 11 पैकी 10 सदस्य ठाकरे गटाचे विजयी झाले असून, फणसोप हे शिवसेना आमदार राजन साळवी यांचं गाव आहे.

gram panchayat election result 2022 : uday samant rajan salvi
Gram panchayat election result Live : नाशिक जिल्ह्यात 'राष्ट्रवादी'-ठाकरेंची मुसंडी, भाजप पिछाडीवर

पोमेंडी बुद्रुक मध्ये ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट विरुद्ध भाजप अशी तिरंगी लढत झाली

पोमेंडी बुद्रुक येथे ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट विरूद्ध भाजप असा तिरंगी सामना रंगला. येथेही ठाकरे गटाने बाजी मारली आहे. पोमेंडी बुद्रुक ग्रामपंचायतमध्ये सरपंच म्हणून ठाकरे गटाच्या ममता जोशी विजयी झाल्या आहेत.

जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील प्रतिष्ठेच्या शिरगाव ग्रामपंचायतीवर सर्वच पक्षांनी लक्ष केंद्रित केले होतं. या ठिकाणी तिरंगी लढत असल्याने निवडणूक रंगतदार बनली होती.

पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आमदार राजन साळवी यांनी कॉर्नर सभा घेऊन निवडणुकीत रंगत आणली होती. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यात पालकमंत्री उदय सामंत, आमदार राजन साळवी यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पण अखेर महाविकास आघाडीने बाजी मारत उदय सामंत यांना धक्का दिला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in