EPFO Tips: नोकरी बदलताच काढू नका पीएफचे पैसे, बसेल 86 लाखांचा फटका

भागवत हिरेकर

काम करणार्‍या लोकांसाठी पीएफ हा मोठा निधी वाचवण्याचा आणि पैसे उभारण्याचा उत्तम मार्ग आहे. नोकरदार लोकांच्या मूळ पगाराचा काही भाग दरमहा पीएफ फंडात जमा केला जातो.

ADVERTISEMENT

This is the easy process to merge PF account
This is the easy process to merge PF account
social share
google news

EPFO News : तुम्ही नोकरी बदलल्यानंतर भविष्य निर्वाह निधीतूनही पैसे काढता का? तुम्ही असे करत असाल तर तुमच्या भविष्याशी खेळत आहात. नोकरी बदलल्यानंतर पीएफचे पैसे काढल्यास काय नुकसान होईल याचा अंदाज तुम्ही कधीच लावला नसेल? जेव्हा तुम्ही त्याचा विचार कराल तेव्हा तुम्हाला नक्कीच पश्चाताप होईल. (Do you also withdraw money from Provident Fund i.e. PF after changing job?)

खरंतर काम करणार्‍या लोकांसाठी पीएफ हा मोठा निधी वाचवण्याचा आणि पैसे उभारण्याचा उत्तम मार्ग आहे. नोकरदार लोकांच्या मूळ पगाराचा काही भाग दरमहा पीएफ फंडात जमा केला जातो. सरकार जमा केलेल्या रकमेवर वार्षिक आधारावर व्याज देते. सरकारने चालू आर्थिक वर्षासाठी 8.15 टक्के व्याजदर निश्चित केला आहे.

15,000 रुपये पगार असणारेही जमा करू शकतात मोठी रक्कम

आता आम्ही तुम्हाला समजावून सांगतो की पीएफचे पैसे काढल्याने मोठे नुकसान कसे होते. समजा एखाद्याचा पगार दरमहा 15 हजार रुपये आहे. ईपीएफओच्या नियमांनुसार, अशा कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यात दरमहा 2351 रुपये जमा केले जातात, ज्यामध्ये कर्मचारी आणि कंपनी दोघेही पैसे देतात.

हेही वाचा >> MLA Disqualification : ‘शेवटची संधी देतोय’, सुप्रीम कोर्ट विधानसभा अध्यक्षांवर संतापले

आता जर आपण सध्याच्या 8.15 टक्के व्याजावर नजर टाकली तर पीएफ खात्यात दरमहा 2351 रुपये जमा केले, तर 10 वर्षांत एकूण 4.34 लाख रुपये जमा होतील. तर 20 वर्षांनंतर ही रक्कम वाढून 14.11 लाख रुपये होईल. सेवानिवृत्तीच्या वेळी म्हणजेच 40 वर्षांनंतर पीएफ खात्यात 86 लाख रुपये अधिक जमा होतील. पण तुम्ही नोकरी बदलल्याबरोबर पीएफचे पैसे काढले, तर निवृत्तीच्या वेळी तुमचा हात रिकामाच राहील. त्यामुळे नोकरी बदलताना पीएफचे पैसे काढण्याऐवजी ते ट्रान्सफर करणे प्रत्येकासाठी फायदेशीर आहे. तुम्ही सर्व पीएफ खाती एका UAN अंतर्गत सहजपणे विलीन करू शकता. ही एक अतिशय सोपी प्रक्रिया आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp