Hardik Pandya IPL: मुंबई इंडियन्सकडे नव्हते पैसे, ‘हा’ खेळाडू देऊन हार्दिकला घेतलं विकत
Hardik Pandya has been traded to Mumbai Indians : हार्दिक पांड्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. गुजरात टायटन्सने रिटेन करूनही हार्दिकने साथ सोडली आहे. त्याला मुंबई इंडियन्सने 15 कोटी रुपयात विकत घेतले.
ADVERTISEMENT

Hardik Pandya IPL Trade : आयपीएल अर्थात इंडियन प्रीमिअर लीगच्या 2024 मधील हंगामापूर्वी मोठी घडामोड घडली. आयपीएल 2024 च्या आधी एक मिनी लिलाव होणार आहे आणि त्याआधी प्रत्येक फ्रँचायझीने रविवारी (26 नोव्हेंबर) संध्याकाळी आपली रिटेन आणि रिलीज यादी जाहीर केली. चाहते या यादीची आतुरतेने वाट पाहत होते कारण गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये सामील होणार असल्याची बातमी आली होती. पण, गुजरातने यादी जाहीर करून पांड्याला कायम ठेवले. हार्दिकसाठी पुरेसे पैसे नसलेल्या मुंबई इंडियन्सने अखेरच्या क्षणी मोठा डाव टाकला आणि हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सकडून विकत घेतले. (hardik pandya joins mumbai indians in ipl 2024)
रिटेन आणि रिलीज याद्या जाहीर झाल्यानंतर दोन तासांनी ही बातमी समोर आली. ट्रान्सफर विंडोच्या माध्यमातून आयपीलएलमधील सर्वात मोठी खरेदी झाली. गुजरातने रिटेन करूनही हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्समध्ये जाण्याला पसंती दिली.
मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्यासाठी मोजले 15 कोटी
हार्दिक पांड्या रोख व्यापाराद्वारे मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आहे. गुजरात आणि मुंबई इंडियन्समध्ये हा करार झाला. पांड्याला १५ कोटींमध्ये करारबद्ध केले आहे. याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही पण ही बातमी काही वेळातच चाहत्यांपर्यंत पोहोचली.
हेही वाचा >> KKR ने सोडला ‘लॉर्ड’ खेळाडू, दिल्ली कॅपिटल्स पृथ्वी शॉला…
हार्दित पांड्या सुरुवातीपासूनच मुंबई इंडियन्सचा एक भाग होता, पण त्याला 2021 मध्ये सोडण्यात आले होते. त्यानंतर तो गुजरात टायटन्समध्ये सामील झाला होता.