Giorgia Meloni : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जियांनी जोडीदारांसोबतचे नाते तोडले, कारण…
Prime Minister Georgia Meloni has separated from her partner Andrea Giambruno : आंद्रिया हा मीडियासेटच्या न्यूज टॉक शो डायरियो डेल जिओर्नोची अँकर आहे, ज्याचे दोन ऑफ-एअर रेकॉर्डिंग दोन दिवसांपूर्वी उघड झाले होते.
ADVERTISEMENT

Giorgia Meloni Husband : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या आपल्या जोडीदारापासून विभक्त झाल्या आहेत. मेलोनींच्या जोडीदाराने आपल्या महिला सहकाऱ्यांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती, त्यानंतर मेलोनींनी पतीपासून विभक्त होत असल्याची घोषणा केली. इटलीच्या पंतप्रधानांचा जोडीदार आंद्रिया गियामब्रुनो हे एक टीव्ही पत्रकार आहे, ज्याचे दोन ऑफ-एअर रेकॉर्डिंग दोन दिवसांपूर्वी उघड झाले होते, त्यानंतर ते वादात सापडले होते. (Italian Prime Minister Georgia Meloni has separated from her partner.)
आपल्या जोडीदारापासून विभक्त झाल्याची बातमी देताना, इटलीच्या पंतप्रधानांनी लिहिले आहे की, ‘जवळपास 10 वर्षे टिकलेले आंद्रिया जियाम्ब्रुनोसोबतचे माझे नाते आता संपुष्टात आले आहे.’
आंद्रिया हा मीडियासेटच्या न्यूज टॉक शो डायरियो डेल जिओर्नोची अँकर आहे, ज्याचे दोन ऑफ-एअर रेकॉर्डिंग दोन दिवसांपूर्वी उघड झाले होते. या रेकॉर्डिंगमध्ये तो एका महिला सहकाऱ्याबद्दल असभ्य आणि अश्लील शेरेबाजी करताना दिसत आहे.
जॉर्जियांना आंद्रियापासून सात वर्षांची मुलगीही आहे. मेलोनींनी पुढे लिहिले की, “आम्ही एकत्र घालवलेल्या सुंदर वर्षांसाठी, आम्ही एकत्र आलेल्या अडचणी आणि माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमची मुलगी जेनेव्हरा यासाठी मी त्याचे आभार मानते. आमचे मार्ग काही काळापासून वेगळे झाले आहेत आणि आता ते स्वीकारण्याची वेळ आली आहे.”
“आम्ही जे एकत्र क्षण घालवले, ते जपून ठेवेन. मी आमची मैत्री जपून ठेवेन आणि सात वर्षाच्या आमच्या मुलीची काळजी घेईन. मी जसं माझ्या आईवडिलांवर प्रेम करते, तसंच ती आमच्यावर करते. मला आता याबद्दल काहीही बोलायचं नाहीये.”