Naresh Goyal : “मला तुरुंगातच मरु द्या”, जेट एअरवेजच्या संस्थापकांना न्यायालयात अश्रू अनावर
जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल शनिवारी (6 जानेवारी) मुंबईतील विशेष न्यायालयात भावूक झाले. हात जोडून गोयल यांनी न्यायालयाला तुरूंगात ठेवण्याची विनंती केली.
ADVERTISEMENT

Naresh Goyal News : जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल शनिवारी (6 जानेवारी) मुंबईतील विशेष न्यायालयात भावूक झाले. हात जोडून गोयल यांनी न्यायालयाला तुरूंगात ठेवण्याची विनंती केली. “माझ्या सर्व आशा मावळल्या आहेत. अशा स्थितीत जगण्यापेक्षा मला तुरुंगातच मरु द्या”, असे सांगताना नरेश गोयल यांना अश्रू अनावर झाले. गोयल हे कॅनरा बँकेच्या 538 कोटी रुपयांच्या फसवणुकीतील आरोपी आहेत. (Naresh Goyal, Founder of Jet Airways told the court that he had “lost every hope of life” and that he would “rather die in jail than live in his present condition”)
कोर्टाच्या रेकॉर्डनुसार, ‘सत्तर वर्षीय नरेश गोयल यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. त्यांनी कोर्टात सांगितले की, त्यांना त्यांची पत्नी अनिताची खूप आठवण येते, जी कॅन्सरच्या पहिल्या अवस्थेत आहे. ईडी (अंमलबजावणी संचालनालय) ने गेल्या वर्षी 1 सप्टेंबर रोजी एका कथित बँक फसवणूक प्रकरणात गोयल यांना अटक केली होती. ते सध्या मुंबईतील आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.
नरेश गोयल यांनी केली होती विनंती
गोयल यांनी विशेष न्यायाधीश एम.जी. देशपांडे यांच्यासमोर जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले आणि कारवाईदरम्यान जेट एअरवेजचे संस्थापक गोयल यांनी काही मिनिटांसाठी वैयक्तिक सुनावणीची विनंती केली, ज्याला न्यायाधीशांनी परवानगी दिली.
कोर्टाच्या ‘रोझनामा’ (दैनंदिन सुनावणीची नोंद) नुसार, “नरेश गोयल यांनी हात जोडून सांगितले की, त्यांची तब्येत खूपच खराब आहे. यावेळी ते सतत थरथरत होते.”