Ganesh Utsav: कल्याणच्या 'मी शिवसेना बोलतेय' देखावा साकारणाऱ्या विजय तरूण मित्रमंडळाची कोर्टात धाव

गणेश उत्सवात साकारण्यात आलेल्या देखाव्याची सामग्री पोलिसांनी केली जप्त
Kalyan's 'Me Shiv Sena Boltey' Ganesh Utsav Action Takcen By Police, Vijay  Vijay Tarun Mitramandal in the court
Kalyan's 'Me Shiv Sena Boltey' Ganesh Utsav Action Takcen By Police, Vijay Vijay Tarun Mitramandal in the court

कल्याणमध्ये विजय तरूण मित्र मंडळाने शिवसेना बोलतोय असं म्हणत एका वटवृक्षाचा देखावा साकारला होता. गणेश उत्सवाच्या औचित्याने साकारण्यात आलेल्या या देखाव्यावर कारवाई करण्यात आली. त्यानंतर विजय तरूण मित्र मंडळाने या कारवाईविरोधात कल्याणच्या कोर्टात याचिका दाखल केली आहे. मंडळाचे सदस्य आणि विश्वस्त विजय साळवी कोर्टात उपस्थित झाले होते. मात्र सरकारी पक्षाचं कुणी आलं नाही त्यामुळे ही सुनावणी उद्यावर गेली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार न्यायमूर्तींनी या प्रकरणात डीसीपी. वरिष्ठ पीआय आणि इतरांना सरकारच्या पक्षातर्फे उपस्थि राहण्याचे आदेश दिले आहेत.

काय आहे कल्याणच्या देखाव्याचं प्रकरण?

कल्याण मधील विजय तरुण मंडळाने यंदा शिवसेनेतील राजकीय घडामोडींवर चलचित्र देखावा साकारला होता. पक्ष निष्ठा या विषयावर चलचित्र देखावा साकारला होता. मी शिवसेना बोलतेय इथून या चलचित्र देखाव्याची सुरूवात करण्यात आली आहे. या देखाव्यात शिवसेनेला मोठा वृक्ष दाखवण्यात आला आहे. या वृक्षाला फळे लागल्यानंतर ती इतर पक्ष खातात अशा आशयाचा हा देखावा होता. मात्र याला कल्याण पोलिसांनी आक्षेप घेतला असून मंडळाच्या विरोधात गुन्हा दाखल करत या देखाव्यावर काल पहाटेच्या सुमारास कारवाई करत देखाव्याची सामग्री जप्त केली. ज्यानंतर या मंडळाने कोर्टात धाव घेतली.

पोलिसांनी जप्त केलेला विजय तरुण मंडळाचा देखावा कसा होता?

या देखाव्यात शिवसेनेला मोठा वृक्षाच्या स्वरूपात दाखवण्यात आलेलं आहे. या वृक्षाला फळे लागल्यानंतर ती इतर पक्ष खातात, अशा आशयाचा हा देखावा आहे. या देखाव्यावर कल्याण पोलिसांनी आक्षेप घेतला. कल्याण पोलिसांनी देखाव्यावर आज (३१ ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास कारवाई केली. पोलिसांनी देखाव्याची सगळं साहित्य जप्त केलं.

मी शिवसेना बोलतेय' देखावा जप्त; विजय तरुण मंडळ पोलिसांच्या कारवाईवर काय म्हणालं?

देखावा जप्त करण्याच्या कारवाईबाबत विजय तरुण मंडळाचे विश्वस्त विजय साळवी म्हणाले, "मंडळतर्फे प्रत्येक वर्षी वर्षभरातील महत्त्वाच्या घडामोडीवर देखावा साकारला जातो. यंदाच्या देखाव्यात काहीच आक्षेपार्ह नव्हतं. पहाटेच्या सुमारास कारवाई केली. ही हिटलरशही आहे. मंडळाने काहीही वादग्रस्त दाखवलं नव्हतं. ताज्या विषयावर भाष्य केलं होतं, तरी देखील देखावा जप्त करण्यात आला आहे", साळवी यांनी सांगितलं.

विजय तरुण मित्रमंडळाकडून 59 वर्षांपासून साजरा केला जातो गणेशोत्सव

कल्याणमधील विजय तरुण मित्र मंडळ स्थापन होऊन 59 वर्षे झाली आहेत. 59 वर्षांपासून या मंडळाकडून गणेश उत्सव साजरा केला जात आहे. दरवर्षी या मंडळाकडून ताज्या घडामोडींवर आधारित देखावा साकारला जातो. यंदा शिवसेनेतील फूट हा ताजा विषय असल्याने या विषयावर देखावा साकारण्यात आला होता.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in