Kasba Peth By Election Results: धंगेकरांनी घडवला इतिहास! भाजपने बालेकिल्ला गमावला
Ravindra Dhangekar Won in Kasba Peth By Election Results Latest News : अतिशय प्रतिष्ठेच्या ठरलेल्या आणि सत्ताधारी आणि विरोधकांनी जोर लावलेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेरकर जायंट किलर ठरले. तब्बल 1995 पासून भाजपकडे असलेला बालेकिल्ला काँग्रेसने महाविकास आघाडीच्या पाठिंब्याने पुन्हा एकदा ताब्यात घेतला. रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा 11 […]
ADVERTISEMENT

Ravindra Dhangekar Won in Kasba Peth By Election Results Latest News : अतिशय प्रतिष्ठेच्या ठरलेल्या आणि सत्ताधारी आणि विरोधकांनी जोर लावलेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेरकर जायंट किलर ठरले. तब्बल 1995 पासून भाजपकडे असलेला बालेकिल्ला काँग्रेसने महाविकास आघाडीच्या पाठिंब्याने पुन्हा एकदा ताब्यात घेतला. रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा 11 हजार 40 मतांनी पराभव केला. (Ravindra Dhangekar defeats hemant rasane)
महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या आणि अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या कसबा पेठ निवडणुकीत भाजपला धक्का बसला. महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवत असलेले काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा मोठा विजय झाला.
कसबा पेठ पोटनिवडणूक निकाल : रवींद्र धंगेकर विरुद्ध हेमंत रासने
मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजपने टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी न देता हेमंत रासने यांना तिकीट दिलं होतं. तर महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला सुटली होती. काँग्रेसनं रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली होती.
Kasba Peth Bypoll Results 2023 : कसब्यात भाजपला झटका, धंगेकरांनी उधळला गुलाल!