भारत आणि कॅनडामधील वाढत्या तणावादरम्यान आणखी एक खलिस्तानी दहशतवादी ठार!

रोहिणी ठोंबरे

सुखविंदर सिंग उर्फ ​​सुखा दुनुके नावाच्या गुंडाची हत्या करण्यात आली. 20 सप्टेंबर 2023 रोजी त्याच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली. एक-दोन नव्हे तर, तब्बल 9 गोळ्या. सुखा 2017 मध्ये बनावट पासपोर्ट बनवून पंजाबमधून कॅनडाला पळून गेला होता. त्याच्यावर पंजाबमध्ये 18 गुन्हे दाखल आहेत.

ADVERTISEMENT

khalistani terrorist sukha dunuke killed between india and canada dispute
khalistani terrorist sukha dunuke killed between india and canada dispute
social share
google news

India-Canada Dispute : कॅनडामध्ये सुखविंदर सिंग उर्फ ​​सुखा दुनुके या गुंडाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. 20 सप्टेंबर 2023 रोजी त्याच्या डोक्यात गोळ्या झाडण्यात आल्या. एक-दोन नव्हे तर, तब्बल 9 गोळ्या. हत्या झाली तेव्हा कॅनडात सकाळचे साडेनऊ वाजले होते. (Khalistani terrorist Sukha Dunuke killed between India and Canada Dispute)

सुखा 2017 मध्ये बनावट पासपोर्ट बनवून पंजाबमधून कॅनडाला पळून गेला होता. त्याच्यावर पंजाबमध्ये 18 गुन्हे दाखल आहेत. काही प्रकरणांमध्ये त्याची निर्दोष मुक्तता झाली होती, तर बहुतांश प्रकरणांमध्ये तपास सुरू होता. हत्येच्या वेळी सुखा कॅनडातील विनिपेग शहरातील हेझल्टन ड्राईव्ह रोडवरील कॉर्नर हाऊसच्या फ्लॅट क्रमांक 203 मध्ये राहत होता. हे त्याचं घर होतं. हल्लेखोरांनी त्याच्या घरात घुसून त्याची हत्या केली.

Bhiwandi Murder : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीचा कटरने गळा चिरला, अन् आरोपीनं थेट…

माहितीनुसार, सुखा हा खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप सिंह उर्फ ​​अर्श डल्लाचा उजवा हात मानला जात होता. तर, हा अर्श डल्ला जूनमध्ये हत्या झालेल्या हरदीप निज्जरचा मित्र आहे. सुखाचा एनआयएच्या वाँटेड यादीत समावेश होता. सुखावर आरोप होता की, तो कॅनडामधून भारतातल्या त्याच्या गुडांमार्फत पैसे उकळण्याची कामही करत होता. तो शस्त्रास्त्रांची तस्करीही करायचा.

त्याची हत्या झाली तेव्हा खुनाला जबाबदार असणाऱ्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू होते. पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येचा आरोप असलेल्या लॉरेन्स बिश्नोई गँगने ही जबाबदारी घेतली. या गँगच्या वतीने सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यात आली होती. ज्यामध्ये गुरलाल ब्रार, विक्की मिड्दुखेडा आणि संदीप नंगल अंबिया यांच्या हत्येत सुखाचा हात असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळेच हा बदला घेण्यात आला. त्यात असे म्हटले होते की, “तो ड्रग्सचा व्यसनी होता आणि त्याने केवळ त्याचे व्यसन भागवण्यासाठी पैशासाठी अनेक घरं उद्ध्वस्त केली होती. पण आता त्याला त्याच्या पापांची शिक्षा मिळाली आहे.”

हे वाचलं का?

    follow whatsapp