आता पाहतो मला...; कोल्हापुरात पाऊल ठेवताच सोमय्यांचा मुश्रीफांना इशारा

Kirit Somaiya in Kolhpur : हसन मुश्रीफांच्या मालमत्तांवर ईडीचे छापे पडल्यानंतर किरीट सोमय्या कोल्हापुरात...
kirit Somaiya first reaction after arrived in kolhapur on ed action against hasan mushrif
kirit Somaiya first reaction after arrived in kolhapur on ed action against hasan mushrif

-दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर

अप्पासाहेब नलावडे आणि सरसेनापती संताजी घोरपडे या दोन्ही साखर कारखान्यातील हसन मुश्रीफांच्या (Hasan Mushrif) गुंतवणुकीबद्दल किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात ईडीने छापेमारी (ED Raid) केल्यानंतर आज किरीट सोमय्या कोल्हापूर (Kolhapur) दौऱ्यावर आहेत. कोल्हापुरात दाखल झाल्यांतर किरीट सोमय्यांनी हसन मुश्रीफांना (Kirit Somaiya-Hasan Mushrif) इशारा दिला.

सुरूवातीलाच किरीट सोमय्यांनी कोल्हापुरात येण्याचं कारण सांगितलं. ते म्हणाले, "आईकडे आशीर्वाद घ्यायला आलोय. आईच्या आशीर्वादामुळे ज्यांनी माफियागिरी चालवली होती, लूटमार चालवली होती. आज महाराष्ट्र त्यातून मुक्त झालेला आहे. काही जाऊन आले, काही आत आहेत आणि काहींवर कारवाई सुरू होत आहे. मला शक्ती दे म्हणून आशीर्वाद घ्यायला आलो आहे."

माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या असंही म्हणाले की, "आता मियाँ हसन मुश्रीफने मला महालक्ष्मी मातेचं दर्शन घेताना थांबवलं होतं. आडवलं होतं. आता मियाँ हसन मुश्रीफ ज्यावेळी घोटाळ्यांवर एका पाठोपाठ एक कारवाई व्हायला लागली. आधी कंपनी मंत्रालय, त्या आधी आयकर विभाग, आता ईडी. आता मियाँ हसन मुश्रीफला आता धर्म आठवला. ते म्हणतात, भाजप-किरीट सोमय्या हे जे मुस्लिम नेते आहेत, मुस्लिम भ्रष्टाचारी नेते आहेत. मग हसन मुश्रीफ असो, नवाब मलिक असो, अस्लम शेख असो त्यांच्या मागे लागलाय."

kirit Somaiya first reaction after arrived in kolhapur on ed action against hasan mushrif
Hasan Mushrif : कार्यकर्ता ते कोल्हापुरमधील राष्ट्रवादीचा चेहरा... हसन मुश्रीफ कोण आहेत?

त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, किरीट सोमय्या काय म्हणाले?

"मियाँ हसन मुश्रीफला आता धर्म आठवला. त्याच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणा केली की किरीट सोमय्या कसं येतो ते बघतो. म्हणून मियाँ हसन मुश्रीफला सांगितलं की, गेल्या वेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यांनी भगवा सोडून हिरवा हातात घेतला होता म्हणून तुम्ही आम्हाला थांबवू शकले. अटक केली. आता पाहतो मला कोण थांबवतो", असा इशाराही किरीट सोमय्यांनी कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर दिला.

kirit Somaiya first reaction after arrived in kolhapur on ed action against hasan mushrif
Hasan Mushrif: आधी मलिक, नंतर मी विशिष्ट धर्माच्या लोकांवर..: मुश्रीफ

न्यायालयाचा निर्णय मान्य असेल -किरीट सोमय्या

"कारवाई सुरू झालेली आहे. कारवाई संदर्भातील अधिक माहिती दुपारी प्रेस मध्ये देऊ. मोदी सरकारवर कुणीही घोटाळेबाज. कुणीही माफिया नेता दबाव टाकू शकत नाही. न्यायालयाला कुणीही प्रभावित करू शकत नाही. मग ते नवाब मलिक असो, किरीट सोमय्या असो वा हसन मुश्रीफ. माझी जबाबदारी आहे की माझ्याकडे माहिती आली, तर तर तक्रार देणं, त्याचा पाठपुरावा करणं. तपास यंत्रणा कारवाई करतात. न्यायालय जो निर्णय देणार तो सगळ्यांना मान्य असेल", असंही किरीट सोमय्यांनी म्हटलंय.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in