Monsoon update : पुढील चार दिवस पावसाचं धुमशान! हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना इशारा
अखेर मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. अनुकूल परिस्थितीमुळे पुढील एक ते दोन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला. दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात लवकरच मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने तसा अंदाज व्यक्त केला आहे. ‘राज्यातील मान्सूनच्या पुढील प्रवासास हवामान अनुकूल होत असून, येत्या […]
ADVERTISEMENT

अखेर मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. अनुकूल परिस्थितीमुळे पुढील एक ते दोन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला. दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
राज्यात लवकरच मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने तसा अंदाज व्यक्त केला आहे. ‘राज्यातील मान्सूनच्या पुढील प्रवासास हवामान अनुकूल होत असून, येत्या २-३ दिवसांत मान्सूनचे महाराष्ट्राच्या अजून काही विभागात आगमन होऊ शकते,’ असं णे हवामान विभागाच्या केंद्राचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी म्हटलं आहे.
१४ जूनपर्यंत राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याचाही अंदाज आहे. के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करून मान्सूनच्या मार्गक्रमणाबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे.
“पुढील ४८ तासांत, मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, गोवा, दक्षिण महाराष्ट्राचा काही भाग, कर्नाटकचा आणखी काही भाग, तामिळनाडूचा उर्वरित भाग, दक्षिण आंध्र प्रदेशचा काही भागात मान्सूनसाठी परिस्थिती अनुकूल आहे. त्यापुढील २ दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी भागात मान्सूनसाठी अनुकूल असेल,” असं त्यांनी म्हटलेलं आहे.