हनुमानाच्या जन्मस्थळाचा वाद पेटला! नाशिकच्या शास्त्रार्थ सभेत महंतांचा राडा
हनुमानाच्या जन्मस्थळाचा वाद चांगलाच पेटला आहे. नाशिकमध्ये हनुमानाचं जन्मस्थळ कोणतं यावरून शास्त्रार्थ सभा बोलवण्यात आली होती. मात्र या सभेत महंतच आपसात भिडले असल्याचं दिसून आलं. या शास्त्रार्थ सभेत किष्किंधातील मठाधिपती गोविंदानंद यांनी केलेल्या दाव्यावरून ही चर्चा आयोजित करण्यात आली होती. गोविंदानंद यांनी वाल्मिकी रामायणाचा हवाला देत किष्किंधा हेच हनुमानाचं जन्मस्थळ असल्याचा दावा केला होता. त्यानंतर […]
ADVERTISEMENT

हनुमानाच्या जन्मस्थळाचा वाद चांगलाच पेटला आहे. नाशिकमध्ये हनुमानाचं जन्मस्थळ कोणतं यावरून शास्त्रार्थ सभा बोलवण्यात आली होती. मात्र या सभेत महंतच आपसात भिडले असल्याचं दिसून आलं. या शास्त्रार्थ सभेत किष्किंधातील मठाधिपती गोविंदानंद यांनी केलेल्या दाव्यावरून ही चर्चा आयोजित करण्यात आली होती.
गोविंदानंद यांनी वाल्मिकी रामायणाचा हवाला देत किष्किंधा हेच हनुमानाचं जन्मस्थळ असल्याचा दावा केला होता. त्यानंतर नाशिकमधले महंत, साधू आणि पुजारी आक्रमक झाले होते. नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वरजवळ असलेला अंजनेरी पर्वत हेच हनुमानाचं जन्मस्थान आहे असा दावा या सगळ्यांनी केला आहे. यातलं नेमकं सत्य काय? यावर चर्चा करण्यासाठी शास्त्रार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र त्यातही राडा झालेला पाहण्यास मिळाला.
सभेच्या सुरूवातीला महंत गोविंदानंद आणि नाशिक महंतांमध्ये वाद झाला. गोविंदानंत महाराज सिंहासनावर बसले होते तर नाशिकच्या महंतांनी आम्ही त्यांच्या समोर खाली बसणार नाही त्यांनी आमच्या सोबत खाली बसून चर्चा करावी अशी मागणी केली होती. हा वाद जवळपास एक तास सुरू होता. त्यानंतर गोविंदानंद महाराजांसह इतर महंत खाली बसले, त्यानंतर सभेला सुरूवात झाली.