Maratha Reservation : ‘त्यांचं नाव तोंडातून काढू नका’, सुनील कावळेंच्या सुसाईड नोटमध्ये काय?
सुनील कावळे या मराठा आरक्षण समर्थक आंदोलकाने मुंबईत आत्महत्या केली. कावळे हे मुंबईत आले, पण त्यांनी पश्चिम द्रूतगती महामार्गावर आत्महत्या केली. त्यांनी गळफास घेण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती.
ADVERTISEMENT

Maratha reservation Sunil Kawale suicide note : ‘मला वाटलं… मी केलं… मला मोठ्या मनाने माफ करा! मी क्षमा मागतो. सर्वांनी मला माफ करावं’, असं म्हणत सुनील कावळे या मराठा आरक्षण आंदोलकाने मुंबईत गळफास घेतला. मुंबईतील वाद्रे पूर्व पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलाला लटकून घेत सुनील कावळे यांनी आत्महत्या केली. (Maratha Reservation Supporter Sunil Kawale Suicide Note)
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर मराठा आरक्षण मागणीने राज्यात जोर धरला. मनोज जरांगे पाटील राज्यभर फिरताहेत. त्यांनी राज्य सरकारला अल्टिमेटमही दिला आहे. जरांगे मुंबईत असतानाच जालना जिल्ह्यातील एका मराठा आंदोलक समर्थक कार्यकर्त्याने आत्महत्या केली.
सुनील कावळे यांनी सुसाईड नोटमध्ये काय म्हटलंय? वाचा सुसाईड नोट जशीच्या तशी
महाराष्ट्राचं कुलदैवत तुळजाभवानी माता हिंदूधर्मरक्षरक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा जय भवानी जय शिवाजी…
मी सुनील बाबूराव कावळे,
मु. पो. चिकणगाव,
तालुका अंबड, जिल्हा जालना










