१९ आणि २० नोव्हेंबरला मध्य रेल्वे मार्गावर २७ तासांचा मेगा ब्लॉक, लोकल आणि एक्स्प्रेस रद्द

मध्य रेल्वे मार्गावर १९ नोव्हेंबरपासून २७ तास मेगाब्लॉक
27-hour mega block, local and express canceled on Central Railway line on November 19 and 20
27-hour mega block, local and express canceled on Central Railway line on November 19 and 20

मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. १९ नोव्हेंबर आणि २० नोव्हेंबर या दोन दिवशी २७ तास मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. CST -मशीद बंद स्थानकादरम्यान धोकादायक असलेल्या कर्नाक उड्डाणपुलाचं पाडकाम करण्यात येणार आहे. या कामानिमित्त मध्य रेल्वे आणि मुख्य हार्बर रेल्वे मार्गावर १ हजार ९६ फेऱ्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. या काळात अनेक मेल आणि एक्स्प्रेस गाड्याची रद्द करण्यात आल्या आहेत. कर्नाक पुलाच्या कामासोबत पुलाच्या कामासाठीही वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

गर्डर टाकण्याचं काम शनिवार-रविवार मध्यरात्री करण्यात येणार आहे

गर्डर टाकण्याचे काम शनिवारी-रविवारी मध्यरात्री करण्यात येणार आहे. या कामामुळे सध्या वापरात असलेल्या दोन्ही बाजूंच्या पुलांवरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिक-मुंबई आणि मुंबई-नाशिक या दोन्ही मार्गिकांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

आज रात्री ११ वाजल्यापासून मेगाब्लॉक

आज म्हणजेच, शुक्रवारी रात्री ११ वाजल्यापासून मेगाब्लॉक सुरू होणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी काही उपनगरीय गाड्या भायखळा ते ठाणे दरम्यान धावतील. रेल्वेनं प्रवाशांना इतर मार्गांवरुन प्रवासाचं नियोजन करण्याचं आवाहन केलं आहे. मुंबई लोकल व्यतिरिक्त, लांब मार्गावरील वाहतूक देखील या मेगाब्लॉकमुळे प्रभावित होणार आहे.

मध्य रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार, रोड ओव्हर ब्रिज (ROB) तोडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि भायखळा स्थानकांदरम्यान १९ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत मुख्य मार्गावर २७ तासांच्या मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेनं शुक्रवारी दिली आहे. रेल्वे प्राधिकरण मोहम्मद अली रोडला पी डी'मेलो रोडला जोडणारा कर्नाक उड्डाणपूलाचं पाडकाम करणार आहे.

मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी यासंदर्भात माहिती देताना म्हटलं की, "कर्णक पूल पाडण्यासाठी आम्ही २७ तासांचा मेगाब्लॉक घेत आहोत, मात्र आम्ही मुख्य मार्ग आणि हार्बर मार्गावरील सेवा निर्धारित वेळेपूर्वी सुरू करण्याचा प्रयत्न करू. आम्ही मुख्य मार्गावरील आमचं काम पूर्ण करण्याचा आणि दुपारी ४ वाजेपर्यंत सेवा पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करू, तसेच हार्बर मार्गावरील सेवाही आम्ही २० नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजेपर्यंत पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in