मुंबईत चार मजली शिवसृष्टी इमारत जमीनदोस्त; दोघांचा मृत्यू, इतरांचा शोध सुरूच

मुंबई महापालिकेनं आधीच दिली होती नोटीस; 7 ते 8 जण अजूनही ढिगाऱ्याखाली असल्याची माहिती
Mumbai Naik Nagar  Building Collapsed
Mumbai Naik Nagar Building Collapsed

मुंबईत पावसाचं आगमन होत नाही, तोच इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. कुर्ला परिसरातील नाईक नगरमध्ये एक चार मजली इमारत सोमवारी मध्यरात्री उशिरा भूईसपाट झाली. या दुर्घटनेत २० ते २० जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. यातील काही जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. इतरांचा अजूनही शोध घेतला जात आहे.

मुंबईतील कुर्ला परिसरात असलेल्या नाईक नगरमध्ये शिवसृष्टी नावाची चार मजली इमारत सोमवारी मध्यरात्री उशिरा कोसळली. एकाच वेळी चारही मजले कोसळल्याने २० ते २५ जण इमारतीच्या ढिगाऱ्याखली दबले गेले.

Mumbai Kurla Naik Nagar Building Accident
Mumbai Kurla Naik Nagar Building Accident
Mumbai Naik Nagar  Building Collapsed
तुमची इमारत अतिधोकादायक आहे का... कसं ओळखाल?

इमारत कोसळल्याची माहिती मिळताच मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलासह मुंबई पोलीस आणि एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले. रात्रीपासून घटनास्थळी मदत व बचाक कार्य सुरू असून अजूनही काहीजण ढिगाऱ्याखाली असल्याची माहिती बीएमसी अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

बचाव पथकाच्या जवानांनी पहाटेपर्यंत सात जणांना बाहेर काढलं होतं. त्यानंतर सकाळी सात वाजेपर्यंत १२ जणांना ढिगाऱ्याखालून सुखरुप काढण्यात जवानांना यश आलं. ढिगाऱ्याखालून काढण्यात आलेल्या जखमींना तातडींने रुग्णालयात हलवण्यात आलं. यात दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

What Happened in Naik Nagar Kurla Mumbai
What Happened in Naik Nagar Kurla Mumbai

या घटनेबद्दल कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इमारत खाली करण्याची नोटीस मुंबई पालिकेकडून देण्यात आली होती. नोटीस मिळाल्यानंतरही काही लोक इमारतीत वास्तव्यास होते, असं त्यांनी सांगितलं.

आधी ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यावर लक्ष दिलं जात असून, नोटीस दिलेल्या बाजूच्या इमारतीतील लोकांना स्थलांतरित केलं जाईल. ज्या इमारतींना नोटीस बजावण्यात आली आहे. तेथील नागरिकांनी लवकरात लवकर इमारत रिकामी करावी, असं आवाहन आदित्य ठाकरेंनी केलं आहे.

या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. मयत व्यक्तीचं वय ३० वर्ष असून, ओळख पटलेली नाही. तर दुसऱ्या मयत व्यक्तीचं नाव अजय बासफोर आहे. चैत बसपाल (वय ३६) या गंभीर जखमी झाला असून, प्रकृती स्थिर आहे. तर संतोषकुमार गौड (वय २५), सुदेश गौड (वय २४), आदित्य कुशवाह (वय १९) यांना उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

अबिद अन्सारी (वय २६), गोविंद भारती (वय ३२), मुकेश मोर्या (वय २५), मनिष यादव (वय २०) हेही दुर्घटनेत जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in