‘लक्झमबर्गचे पंतप्रधान मोदी भक्त’; शिंदेंचा किस्सा, मोदींनाही हसू अनावर

मुंबई तक

मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Pm Narendra Modi in Mumbai) उपस्थित विविध विकासकामांचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Cm Eknath Shinde) जोरदार भाषण करत विरोधकांना लक्ष्य केलं. यावेळी शिंदेंनी दावोसमधील प्रसंगही सांगितला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलेला प्रसंग ऐकून पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही (Pm Narendra Modi) हसू आवरता आलं नाही. (Eknath Shinde Todays speech) कार्यक्रमात […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Pm Narendra Modi in Mumbai) उपस्थित विविध विकासकामांचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Cm Eknath Shinde) जोरदार भाषण करत विरोधकांना लक्ष्य केलं. यावेळी शिंदेंनी दावोसमधील प्रसंगही सांगितला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलेला प्रसंग ऐकून पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही (Pm Narendra Modi) हसू आवरता आलं नाही. (Eknath Shinde Todays speech)

कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “मेट्रोचा लाखो मुंबईकरांना फायदा होईल. मेट्रोच्या कामाला देवेंद्र फडणवीसांच्या काळात चालना मिळाली. मधल्या काळात दुसरं सरकार आलं. त्यात मला जायचं नाही. पुन्हा एकदा मेट्रोच्या कामाला चालना मिळाली आहे. प्रदूषण कमी होऊन लोकांच्या जीवनात आमूलाग्र बदल होईल.”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले, “मुंबईकरांना आरोग्य सेवा मिळावी म्हणून दवाखाने सुरू होत आहे. इच्छाशक्ती पाहिजे. इच्छाशक्ती असल्यामुळे अनेकवर्षानंतर प्रश्न सुटताहेत. रस्ते सिमेंट काँक्रिटचे करतोय. 400 किमी रस्त्यांचं भूमिपूजन आज पंतप्रधान करणार आहेत. पुढच्या दोन अडीच वर्षात संपूर्ण मुंबई खड्डेमुक्त होईल आणि लोकांचं जीवन सुसह्य होईल.”

आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र, एकनाथ शिंदे काय म्हणाले?

मुंबईतील सिमेंट रस्त्याच्या कामावरून आदित्य ठाकरेंनी सरकारला लक्ष्य केलं. त्यावरून शिंदेंनी पलटवार केला. “काही लोक खोडा घालण्याचं काम करताहेत. त्यांना त्यांचं काम करू द्या. आपण आपलं करू. दरवर्षी जे खड्ड्यांचा प्रवास, खड्ड्यांमुळे गेलेले मुंबईकरांचे बळी, आता पैसा वाचवण्याचं काम आम्ही करतोय. निष्पाप लोकांचे बळी जाणार नाही. डांबरीकरणाच्या नावाखाली काळंपांढरं करणाऱ्या लोकांची दुकानं बंद होईल”, असं शिंदे म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp