राज ठाकरे 'वर्षा' वर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरच्या बाप्पाचं घेतलं दर्शन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सहकुटुंब वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गणपतीच्या दर्शनाला गेले होते
MNS Chief Raj Thackeray At Vasha Bungalow For Ganpati Darshan Discussion with CM Eknath Shinde
MNS Chief Raj Thackeray At Vasha Bungalow For Ganpati Darshan Discussion with CM Eknath Shinde

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेतलं. राज ठाकरे यांच्या सोबत त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे हेदेखील होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं स्वागत केलं. तर खासदार श्रीकांत शिंदे यांनी अमित ठाकरेंचं स्वागत केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातली जवळीक वाढलेली दिसून येते आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची पुन्हा एकदा भेट

गणपती दर्शनाचं निमित्त असलं तरीही राजकीय चर्चा ही नेत्यांमध्ये घडत असतेच. गणेश उत्सवात चर्चा होते आहे ती दसरा मेळाव्याची. दसरा मेळावा एकनाथ शिंदे घेणार आहेत अशा बातम्या समोर येत आहेत. तसंच या मेळाव्यात ते राज ठाकरेंना बोलवणार असल्याच्याही चर्चा आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही राज ठाकरेंना भेटले होते

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील राज ठाकरेंच्या घरी गणपतीच्या दर्शनाला गेले होते. तिथे त्यांच्यात अनेक विषयांवर चर्चा झाली. २१ जूनला राज्यात राजकीय बंड झालं. शिवसेना दुभंगली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचा एक गट आणि उद्धव ठाकरेंचा एक गट असे दोन गट शिवसेनेत पडले आहेत. या सगळ्यात आता राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या घरी जाणं हेदेखील राजकीय दृष्ट्या सूचक मानलं जातं आहे.

राज ठाकरे हे आपल्या पूर्ण कुटुंबासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी गणपतीच्या दर्शनला गेले होते. त्यांच्या या भेटीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in