विधान परिषद निवडणूक: मतदान करू द्या! अनिल देशमुख-नवाब मलिक पुन्हा कोर्टाच्या दारात

विद्या

महाविकास आघाडी सरकारमधले मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख या दोघांनीही आता विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क हवा म्हणून नव्याने कोर्टात अर्ज केला आहे. राज्यसभेच्या वेळी या दोघांनाही कोर्टाने मतदानाचा अधिकार दिला नव्हता. त्यानंतर आता २० जून रोजी विधान परिषदेसाठी मतदान होणार आहे. या मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून दोघांनीही नव्याने अर्ज दाखल केला […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

महाविकास आघाडी सरकारमधले मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख या दोघांनीही आता विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क हवा म्हणून नव्याने कोर्टात अर्ज केला आहे. राज्यसभेच्या वेळी या दोघांनाही कोर्टाने मतदानाचा अधिकार दिला नव्हता. त्यानंतर आता २० जून रोजी विधान परिषदेसाठी मतदान होणार आहे. या मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून दोघांनीही नव्याने अर्ज दाखल केला आहे.

नवाब मलिक १० जूनला झालेल्या राज्यसभा निवडणूक प्रक्रियेत मतदान करण्याची संमती मागितली होती. मात्र पीएमएलए विशेष न्यायालयाने नवाब मलिक यांना कोणताही दिलासा दिला नाही. त्यानंतर नवाब मलिक यांच्या वकिलांनी या निकालाला आव्हान देणारी याचिका हायकोर्टात दाखल केली होती. मात्र हायकोर्टानेही त्यांना दिलासा दिला नव्हता. तसंच अनिल देशमुख यांनाही मतदानाची संमती दिली नव्हती. आता पुन्हा एकदा या दोघांनी विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज केले आहेत. यासंदर्भात न्यायालयात १५ जूनला सुनावणी होणार आहे.

दाऊदचा भाचा अलीशाह पारकरचा ‘तो जबाब’ ज्यामुळे अडकले नवाब मलिक

दुसरीकडे १०० कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री हे तुरूंगात आहेत. अनिल देशमुख हे न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी जामीन मिळावा म्हणून याचिका दाखल केली आहे. मात्र या याचिकेला सीबीआयने विरोध केला आहे. या प्रकरणी आता मंगळवारी सुनावणी होणार आहे.

हे वाचलं का?