नवाब मलिक यांचा रूग्णालयातला मुक्काम वाढला, जामीन अर्जावरची सुनावणी २४ ऑगस्टला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती आणखी बिघडल्याने त्यांचा रूग्णालयातला मुक्काम वाढला आहे. मुंबई सत्र न्यायालयात त्यांनी जामीन मिळावा म्हणून अर्ज केला आहे. त्यावर २४ ऑगस्टला सुनावणी घेण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रींग प्रकरणात ईड़ीकडून नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर कुर्ला येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

नवाब मलिक यांच्यावर कुर्ला येथील रूग्णालयात उपचार सुरू

नवाब मलिक यांना न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार घाटकोपर येथील मेडिकल स्कॅन सेंटरमध्ये चाचणीसाठी नेण्यात आलं होतं. या चाचणीनंतर डॉक्टरांनी मलिक यांना रूग्णालयात पुन्हा दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर नवाब मलिक यांना कुर्ला येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मलिक यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहे. त्यांचं एक आठवड्याने पुन्हा मेडिकल स्कॅन करण्यात येईल अशी माहिती त्यांच्या वतीने बाजू मांडत असताना अॅड. जानकी गर्दे यांनी मुंबई सत्र न्यायालयाला दिली. त्यानंतर त्यांच्या जामिनावरची सुनावणी २४ ऑगस्टला घेण्यात येईल असं न्यायालयाने सांगितलं.

हसीना पारकरच्या मुलाच्या जबाबामुळे अडकले नवाब मलिक

दाऊदची बहीण हसीना पारकरचा मुलगा अलीशाह पारकर हा मुंबईत राहतो. कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंडचा काही भाग नवाब मलिक यांना विकल्याचा खुलासा त्याने केला. नवाब मलिक यांना फेब्रुवारी महिन्यात ईडीने मनी लाँड्रिंग आमि टेरर फंडिंगच्या आरोपाखाली अटक केली. इंडिया टुडेनेच ही बातमी दिली होती. अशात अलीशाह पारकरचा जबाब हा अत्यंत महत्त्वाचा ठरला. ज्यामुळे ईडीने मलिक यांच्याविरोधात खटला उभा करण्यास मोलाची मदत केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काय म्हणाला अलीशाह पारकर?

“माझी आई दिवंगत हसीना पारकर ही गृहिणी होती. उदरनिर्वाहासाठी ती छोटे-मोठे आर्थिक व्यवहार करत होती. तिच्या मालकीच्या मालमत्तेतून तिला भाडे मिळत असे. साधारण ३ ते ५ लाख रूपये भाडे तिला मिळत होतं. माझी आई (हसीना पारकर) रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची. दाऊदची बहीण अशीही तिची ओळख होती. त्यामुळे मालमत्तेशी संबंधित वादही ती मिटवत होती.”

ADVERTISEMENT

“दाऊद इब्राहिम (मामा) आणि माझी आई (हसीना पारकर) यांच्यातले संबंध हे चांगले होते. ते वारंवार एकमेकांशी फोनवरून बोलत होते. माझी आई तिच्या मृत्यूपर्यंत दाऊद आणि हसीना पारकर हे आर्थिक व्यवहार करत होते.”

ADVERTISEMENT

माझ्याकडे फारसा तपशील नाही मात्र मला हे माहित आहे की माझी आई हसीना पारकर दाऊद इब्राहिमच्या म्हणजेच माझ्या मामाच्या मालमत्तेवर लक्ष ठेवत होती. माझी आजी अमीना बी कासकर यांच्या नावावर या मालमत्ता होत्या. SAFEMA, NDPSA मुंबई २००८ मध्ये संलग्न केलं होतं. त्यानंतर इकबाल कासकर (माझे काका) यांनी दाऊद इब्राहिम म्हणजेच माझ्या मामाच्या मालमत्तेचा ताबा घेतला आणि त्यांची देखभाल सुरू केली.

माझ्या आईचे (हसीना पारकर) दोन प्रमुख सहकारी होते. एक होता सलीम पटेल, दुसरा होता खालिद जो गाडी चालवत होता. शमीन म्हणून एकजण होता तो देखील माझ्या आईसाठी काम करत होता. सलीम पटेल हा कांद्याची खरेदी विक्री करत होता आणि मालमत्तेच्या व्यवहारातही होता. माझी आई हसीना पारकर आणि सलीम पटेल यांनी कुर्ल्यातील गोवावाला बिल्डिंगचा वाद मिळवला होता. तिथे ऑफिस सुरू करण्यात आलं आणि कंपाऊंडच्या काही भागावर ताबा मिळवला गेला होता.

माझ्या आईच्या वतीने या मालमत्तेशी संबंधित वाद काय होता ते माहित नाही. मात्र सलीम पटेल त्या ऑफिसमध्ये बसून कामकाज पाहात असे. त्यानंतर माझी आई हसीना पारकरने तिच्या ताब्यात असलेला भाग नवाब मलिक यांना विकला होता. नवाब मलिक यांनी माझी आणि सलीम पटेल यांना नेमका किती मोबदला दिला ते मला माहित नाही असंही अलीशाह याने सांगितलं. मात्र नेमकं हेच वक्तव्य ईडीला नवाब मलिक यांच्या विरोधात मोठा पुरावा मिळाला. त्यामुळेच त्यांना अटक करण्यात आली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT