'राहुल गांधींना अटक करून खटला दाखल करा', रणजित सावरकरांच्या तक्रारीत नाना पटोलेंचाही उल्लेख

Rahul Gandhi-Veer Savarkar : राहुल गांधींच्या विधानानंतर सावरकरांचे पणतू रणजित सावरकरांनी दिली पोलिसांत तक्रार
Congress Leader Rahul Gandhi
Congress Leader Rahul Gandhi

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलीये. वीर सावरकर यांचे पणतू रणजित सावरकर यांनी मुंबईतल्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिलीये.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान वाशीम येथील सभेत वीर सावरकर हे ब्रिटिशांकडून पेन्शन घेत होते आणि भारताविरुद्ध काम करत होते, असा आरोप केला होता. यावर रणजित सावरकरांनी आक्षेप घेतला आहे.

रणजित सावरकर यांनी मुंबईतल्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिलीये. या तक्रारीत राहुल गांधी यांना अटक करण्याची मागणी करण्यात आलीये. त्याचबरोबर नाना पटोले यांच्याविरुद्धही कारवाईची मागणी करण्यात आलीये.

Congress Leader Rahul Gandhi
राहुल गांधी यांचं फडणवीस-शेवाळे यांना प्रत्युत्तर : वीर सावरकर यांचं 'ते' पत्र आणलं समोर

रणजित सावरकर तक्रारीत म्हणतात, "काँग्रेसचे राहुल गांधी यांनी १६ नोव्हेंबर २०२२ रोजी वाशीम येथे जाहीर सभेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिशांची माफी मागितली, असं खोटं विधान करून त्यांची बदनामी केली आहे."

रणजित सावरकरांनी राहुल गांधींवर काय केले आरोप?

"या शिवाय सावरकर ब्रिटिशांकडून पेन्शन घेत होते आणि त्यांच्या आदेशानुसार हिंदुस्थानविरुद्ध काम करीत होते, अशी धादांत खोटी विधाने करत सावरकरांसारख्या थोर राष्ट्रपुरूषाचा अवमान केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करून खटला दाखल करावा, अशी विनंती करत आहे", असं रणजित सावरकर यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

"ही बातमी मी माझ्या दादर येथील निवासस्थानी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ट्विटर हॅण्डलवर पाहिली. तसेच काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी देखील आज सकाळी (१७ नोव्हेंबर) असेच व्यक्तव्य करून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान केला आहे. हे वृत्त मी दूरदर्शनवर पाहिलं", असंही रणजित सावरकर यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

Congress Leader Rahul Gandhi
Bharat Jodo Yatra महाराष्ट्रातच थांबवा; गटनेते राहुल शेवाळेंची शिंदे-फडणवीसांकडे मागणी

रणजित सावरकरांनी मुंबईत का दिली तक्रार?

रणजित सावरकर तक्रारीत म्हणतात, "माझे निवासस्थान आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्यानं ही तक्रार आपल्याकडे नोंदवत आहे, तरी आपण राहुल गांधी आणि नाना पटोले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी ही विनंती."

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in