मुंबई : 14 वर्षीय लेक झोपेत असताना बापानेच ब्लेडने गळा चिरला; पत्नीच्या पोटावरही केले वार

मुंबई तक

Mumbai Crime : 14 वर्षीय मुलगी गाढ झोपेत असताना तिच्या गळ्याजवळ तीव्र वेदना जाणवल्या. काहीतरी चावल्यासारखी भावना झाल्याने ती दचकल्याचं समजताच, वडिलांनी ब्लेडने गळ्यावर गंभीर वार केल्याचे तिला लक्षात आले.

ADVERTISEMENT

Mumbai Crime
Mumbai Crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई : 14 वर्षीय लेक झोपेत असताना बापानेच ब्लेडने गळा चिरला

point

पत्नीच्या पोटावरही केले वार, दहिसरमधील धक्कादायक घटना

Mumbai Crime : मुंबईमध्ये सोमवारी मध्यरात्री दहिसरच्या कोकणी पाडा परिसरात धक्कादायक घटना घडली. दारूच्या व्यसनाधीन एका व्यक्तीने झोपेत असलेल्या स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला केला, तसेच तिला वाचविण्यासाठी धावून आलेल्या पत्नीला देखील ब्लेडने जखमी केले. या गंभीर प्रकरणात पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

हनुमंत सोनवळ (36) असे या आरोपीचे नाव असून, तो बराच काळ दारूच्या नशेत पत्नीवर संशय घेत मारहाण करीत असल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्या सततच्या अत्याचाराला कंटाळून पत्नी राजश्री यांनी वांद्रे कोर्टात घटस्फोटाची प्रक्रिया सुरू केली होती. त्या अनुषंगाने त्या सोमवारी नालासोपाऱ्यात वकिलांशी चर्चा करून घरी परतल्या, मात्र उशिराने घरी येण्यावरून हनुमंतने त्यांच्यावर आक्षेप घेतला. त्याने संतापाच्या भरात पत्नी आणि मुलीला ठार मारण्याची धमकी दिली होती.

हेही वाचा : पुण्यातील हिंजवडी IT परिसरात भीषण अपघात, भरधाव बस फुटपाथवर चढली अन् सख्ख्या भावंडांना चिरडलं, धडकी भरवणारा Video

रात्री साधारण सव्वादोनच्या सुमारास ही घटना घडली. 14 वर्षीय मुलगी गाढ झोपेत असताना तिच्या गळ्याजवळ तीव्र वेदना जाणवल्या. काहीतरी चावल्यासारखी भावना झाल्याने ती दचकल्याचं समजताच, वडिलांनी ब्लेडने गळ्यावर गंभीर वार केल्याचे तिला लक्षात आले. ती प्राणांतिक वेदनेने ओरडू लागल्यावर आई राजश्री तिला वाचविण्यासाठी धावल्या. मात्र संतापलेल्या हनुमंतने त्यांच्यावरही ब्लेडने हल्ला करून पोटावर वार केला.

हे वाचलं का?

    follow whatsapp