Mumbai Weather: मुंबईत पावसाची बॅटिंग सुरूच राहणार, ठाणे आणि पालघरमध्ये कसं असलं हवामान?

मुंबई तक

Mumbai Weather Today: 4 ऑक्टोबर 2025 साठी मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी हवामान नेमकं कसं असेल याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. जाणून घ्या त्याविषयी.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) जारी केलेल्या अंदाजानुसार आज (4 ऑक्टोबर 2025) रोजी मुंबई, ठाणे आणि पालघर या विभागातील जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसासह गडगडाट आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. या भागांसाठी "वॉच (Be Aware)" श्रेणीतील इशारा देण्यात आला आहे.

मुंबईतील हवामान कसं असेल?

मध्यम पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडू शकतात. पावसासोबत वाऱ्याचा वेग 30 ते 40 किमी प्रति तास असण्याची शक्यता आहे. तापमान सुमारे 24 ते 29 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे, तर आर्द्रता जास्त राहील.

हे ही वाचा>> मुंबईची खबर: आता रात्री सुद्धा दुकाने राहणार खुली! प्रशासनाचा मोठा निर्णय अन् कामगारांना सुट्टी सुद्धा...

ठाण्यातील हवामानाचा अंदाज 

ठाणे जिल्ह्यातही मध्यम पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी गडगडाट आणि वाऱ्याचा वेग 30-40 किमी प्रति तास असू शकतो. किनारपट्टीवरील भागात वाऱ्याचा प्रभाव जास्त असण्याची शक्यता आहे.

पालघरमध्ये पावसाचा अंदाज

पालघरमध्ये मध्यम पावसासह गडगडाटाची शक्यता असून येथील किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग 30-40 किमी प्रति तासापर्यंत पोहोचू शकतो, ज्यामुळे किनारपट्टीवरील भागात सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp