दहीहंडी निमित्त पाहा ही स्पेशल गाणी, मग तुम्हीही म्हणाल 'गोविंदा आला रे आला'

दहीहंडीचा उत्सव आज दिवसभर अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात येतो आहे
Watch Special Songs on Mobile on Dahi Handi
Watch Special Songs on Mobile on Dahi Handi

दहीहंडीचा उत्सव आज दिवसभर साजरा करण्यात येतो आहे. दहीहंडीच्या निमित्ताने महाराष्ट्रात सुट्टीही जाहीर करण्यात आली आहे. थरांचा उत्साह, विविध गाणी, पाऊस, पाणी, दहीहंडी या सगळ्याचा उत्साह दिवसभर पाहण्यास मिळणार आहे. दहीहंडीच्या दिवशी पाऊस पडत असला तरीही गोविंदांचा उत्साह तसूभरही कमी होत नाही. यावर्षी कोरोनाचं संकट नाही. त्यामुळे मागच्या दोन वर्षांप्रमाणे निर्बंध नाहीत. दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच हा सण उत्साहात साजरा होतो आहे. या निमित्ताने ही गाणी पाहा.. आणि आपल्या आप्तेष्टांना शुभेच्छा द्या.

दहीहंडी उत्सवात वाजवली जाणारी प्रसिद्ध गाणी

गोविंदा आला रे आला हे पहिलं गाणं आहे जे शम्मी कपूर यांच्या ब्लफ मास्टर या सिनेमात होतं. आजही ते गाणं वाजलं की उत्साह आणि चैतन्य कशाला म्हणतात त्याचा अनुभव आल्याशिवाय राहात नाही. अभिनेता शम्मी कपूर या गाण्यात जे नाचला आहे त्याला खरंच जवाब नाही. आजही हे गाणं आपल्याला आनंद देऊन जातं. खु

Govinda Ala re ala Song From Bluff master movie
Govinda Ala re ala Song From Bluff master movie

यानंतरचं गाणं आहे ते म्हणजे खुद्दार या सिनेमातलं. अमिताभ बच्चन आणि परवीन बाबी यांच्यावर चित्रित झालेलं मच गया शोर सारी नगरी रे हे गाणं. या गाण्यात अमिताभ बच्चन यांनी दहीहंडी फोडली आहे. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी हे गाणं गायलं आहे. या गाण्याशिवाय गोविंदा आजही अधुरा आहे.

Still from Movie Khuddar
Still from Movie Khuddar

या पुढचं गाणं आहे शोर मच गया शोर देखो आया माखनचोर. हे गाणं १९७४ मध्ये आलेल्या बदला या सिनेमातलं आहे. शत्रुघ्न सिन्हा आणि सुनील दत्त यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही लोकांच्या स्मरणात आहे. किशोर कुमार यांनी हे गाणं गायलं आहे.

A still from Movie Badla
A still from Movie Badla

सलमान खान आणि राणी मुखर्जीचे फॅन असाल तर तुम्हाला आणखी एक गाणं आम्ही दही हंडीच्या निमित्ताने सांगणार आहोत. हे गाणं आहे हॅलो ब्रदर या सिनेमातलं. चांदी की डाल पर सोने का मोर ताक झाक ताक करे निचे का चोर... हे ते गाणं आहे. हे गाणंही दरवर्षी दहीहंडीच्या दिवशी वाजवलं जातं. हे गाणं पाहिल्यावर तुम्हाला गोविंदांचा मॉडर्न उत्साह काय असतो तो बघायला मिळेल. गणेश आचार्य यांनी हे गाणं कोरिओग्राफ केलं आहे.

Still from Movie Hello Brother
Still from Movie Hello Brother

या पुढचं गाणं आहे प्रभू देवाने कोरिओग्राफ केलेलं. प्रभू देवा आणि सोनाक्षी सिन्हा यांच्यावर हे गाणं चित्रित झालं आहे. या गाण्याचे बोल आहेत गो गो गो गोविंदा... ओह माय गॉड या सिनेमातलं हे गाणं आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या गाण्याचे बोल आणि प्रभू देवा सोनाक्षीचा डान्स लोकांना आवडतो. आजच्या दिवशी हे गाणं पाहा आणि रिफ्रेश व्हा.

Still from Movie Oh My God
Still from Movie Oh My God

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in